मुक्तपीठ टीम
गेल्या दोन वर्षांपासून नेरळ ते माथेरान टॉय ट्रेन बंद असतानाही, या सेवेची लोकप्रियता प्रचंड आहे, हे यंदाच्या मोसमात गेल्या ९ दिवसांत ४ लाख ८१ हजार रुपयांच्या महसुलामुळे स्पष्ट झाले आहे. तो एकूण रकमेच्या जवळपास ३१% आहे.
मुंबई, पुणे आणि परिसरातील नागरिकांसाठी माथेरान हे सर्वात जवळचे आणि सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. ही टॉय ट्रेन गेल्या १०० वर्षांहून अधिक जुनी आहे. ती भारतातील काही पर्वतीय रेल्वेंपैकी एक आहे. सन २०१९ मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नेरळ- माथेरान ट्रॅक वाहून गेला होता. तेव्हापासून मध्य रेल्वे युद्धपातळीवर रेल्वेची पुनर्बांधणी आणि पुनर्स्थापना करीत आहे. नेरळ ते अमन लॉजपर्यंत पर्वतांना वळण देणारा नॅरोगेज मार्ग अखेर तयार झाला. २२ आॅक्टोबर २२ रोजी या मार्गावरील सेवा पुन्हा सुरू झाली. या सेवेचे प्रवाशांनी अत्यंत आनंदात स्वागत केले असून त्याला उदंड प्रतिसाद दिला.
२२ आॅक्टोबर २२ ते ३० आॅक्टोबर २२ या कालावधीत, व्हिस्टाडोममध्ये २२९, प्रथम श्रेणीतील ३७८ आणि द्वितीय श्रेणीतील ३,०९१ अशा एकूण 3 हजार 698 प्रवाशांनी प्रवास केला. त्यामुळे ‘म.रे’ला ४,८४,१४१ रु.चा महसूल मिळाला. यामध्ये व्हिस्टाडोम तिकीट विक्रीतून १,४९,९९५/- रुपये इतका महसूल समाविष्ट आहे.
सुरक्षित आणि आरामदायी प्रवास उपलब्ध करून देण्यात ही आकडेवारी या पर्यटनस्थळी येणा-या प्रवाशांसाठी रेल्वेची महत्त्वाची भूमिका दर्शवते.