Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“महाराष्ट्र हे महिलांना आदर सन्मान देऊन नेतृत्वाला संधी देणारे राज्य” – डॉ नीलम गोऱ्हे

April 6, 2022
in सरकारी बातम्या
0
मा उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी परिचय केंद्राला भेट दिली 2

मुक्तपीठ टीम

‘महाराष्ट्र हे महिलांना आदर सन्मान देऊन नेतृत्वाला संधी देणारे राज्य आहे. या राज्यातील महिलांच्या रक्तात आणि आत्म्यातच नेतृत्वगुण भिनला आहे. राणी लक्ष्मी बाई, अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले, मृणाल गोरे, भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या सर्वांच्या कार्याने आम्ही सर्वजण भारावून गेलो आहोत. हे सर्वजण महाराष्ट्राची शान आणि अभिमान आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याने महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ५०% आरक्षणही जाहीर केले आहे. आज विधीमंडळ सदस्यांसाठी आयोजित केलेले प्रशिक्षण हे नक्कीच भावी प्रवासात मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही,’ असे प्रतिपादन विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज लोकसभा सचिवालयातील प्राईड सभागृहात केले.

            

आज महाराष्ट्रातील नवनिर्वाचित सदस्यांकरिता नवी दिल्लीमध्ये प्राइड संस्था आणि लोकसभा सचिवालय यांच्यावतीने आयोजित केलेल्या प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी उपसभापती डॉ.गोऱ्हे बोलत होत्या.

            

उपसभापती डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, संसदीय आयुधांचा वापर करून आपल्या कार्यशैलीने जनहिताची कामे करता येतात. यासाठी विविध आयुधे, नियम, प्रक्रिया यांची सखोल माहिती घेणे गरजेचे आहे.  विविध विषयांची माहिती घेऊन त्याला तंत्रज्ञानाची जोड देणे अत्यावश्यक ठरत आहे. या पार्श्वभूमीवर अशा प्रकारची प्रशिक्षणे निश्चितच उपयोगी ठरतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

            

यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला यांचे उद्घाटनपर भाषण झाले. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, संसदीय कार्यमंत्री ॲड.अनिल परब यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या प्रशिक्षणाला महाराष्ट्रातून १०० पेक्षा अधिक नवनिर्वाचित विधिमंडळ सदस्यांनी हजेरी लावली आहे. प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत, महेंद्र काज आणि त्यांचे सर्व सहकारी प्रयत्नशील आहेत.

 

महाराष्ट्रात महिला सक्षमीकरणाचे प्रभावी कार्य  – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्‍हे

घरकामगार महिलांची नोंदणी, महिला सुरक्षेसाठी ‘शक्ती कायदा’, विधवा महिलांच्या पुनर्वसनाला चालना देण्यासाठी  ‘पंडिता रमाबाई महिला उद्योजक योजना’ अशा अनेक योजना व कायद्यांद्वारे महाराष्ट्र शासन महिला सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण कार्य करीत असल्याची माहिती महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्‍हे  यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्रात दिली.

                

महाराष्ट्रातील  नवनिर्वाचित आमदारांसाठी  संसदेत प्रशिक्षण वर्ग सुरु झाला आहे.

या  प्रशिक्षण  वर्गाचे  उद्घाटन  झाल्यानंतर  डॉ. गोऱ्हे  यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली, यावेळी त्यांनी ही माहिती दिली. जनसंपर्क अधिकारी  तथा  उपसंचालक (अ.का.) अमरज्योत कौर अरोरा यांनी  शाल, श्रीफळ  व  पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान डॉ. गोऱ्हे  यांनी राज्य शासनाच्या विविध योजना व कायद्यांद्वारे महिला सक्षमीकरणाबाबत होत असलेल्या कार्याची माहिती दिली.

                    

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊले उचलली आहेत. शेतकऱ्यांच्या  विधवा  महिलांना संपत्तीत व जमिनीत वाटा मिळण्यास येत असलेली अडचण दूर करण्यासाठी महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक जिल्ह्यांमध्ये शिबिर आयोजित करून अशा महिलांच्या अडचणी दूर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून महसूल विभागाकडून  याबाबत  सकारात्मक  प्रतिसाद मिळाल्याचेही  त्यांनी नमूद केले. 

               

विधवा आणि एकल महिलांविषयी समाजाच्या दृष्टीकोणामध्ये पाहिजे तसा बदल झाल्याचे दिसून येत नाही. यात सकारात्मक बदल घडवून यावा म्हणून  विधवा आणि एकल महिलांच्या  पुनर्वसनासाठी  राज्य शासनाने  महत्वाचा निर्णय घेत,  पंडिता रमाबाई  यांच्या  स्मृतीप्रित्यर्थ  योजना आणल्याचे त्यांनी  अधोरेखित केले.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महिलांसाठी वसतीगृह उभारण्याचा विषय प्राधान्याने हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले. एकल महिलांनाही  रोजगार हमी  योजनेंतर्गत जॉब कार्ड देण्यात आले असून  त्यांना  या माध्यमातून नियमित रोजगार मिळत आहे. कामगार महिलांची नोंदणी करण्याचे कार्य राज्य शासनाने हाती घेतल्याचेही डॉ.गोऱ्हे यांनी नमूद केले.

महिला सुरक्षेसाठी  महत्त्वपूर्ण कायदे           

पीडित महिलांना जलदगतीने न्याय मिळण्यासाठी राज्य शासनाने मांडलेले ‘शक्ती विधेयक’ विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाकडून मंजूर होवून राज्यपालांकडून सद्या केंद्रीय गृहमंत्रालयाकडे हे विधेयक पाठविण्यात आले आहे. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होऊन महिलांना सुरक्षेची हमी देणारा कायदा राज्यात प्रभावीपणे राबविण्यात येईल, असा  विश्वासही  त्यांनी  यावेळी व्यक्त केला. यासोबतच ५२  क्रमांकाच्या  विधेयकानुसार महिलांसाठी स्वतंत्र न्यायालये  उभारणे व  महिलांसाठी  विशेष सरकारी वकील नेमून देणे अशा काही तरतूदी आहेत. प्रत्येक  ठिकाणी  महिलांची पोलीस पथक निर्माण करून महिलांना  दिलासा देण्याचा प्रयत्न या विधेयकाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. या दोन्ही विधेयकांना  केंद्राकडून लवकर मंजुरी  मिळण्याची  अपेक्षाही डॉ.गोऱ्हे यांनी व्यक्त  केली.

मावजच्या कार्याला विश्वासार्हता            

उपसभापती डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, राज्य शासनाचे  माहिती व जनसंपर्क महासंचालनालय  (मावज) प्रभावीपणे कार्य करीत असल्याचे समाधान आहे. मावजच्या कार्याला  विश्वासार्हता असून मावजकडून महिला विषयक कायदे आणि योजनांची अधिकाधिक  माहिती जनतेपर्यंत पोहचावी, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी  व्यक्त  केली.

                

महिलांच्या विविध अडचणी सोडविण्यासाठी ‘स्त्री  आधार  केंद्र’ या संस्थेद्वारे  करण्यात येणाऱ्या कार्याविषयी, तसेच महिलांच्या प्रश्नांविषयी देश-विदेशात केलेले अभ्यास दौरे आणि  विविध मंचाहून मांडलेले विचार आदींविषयी त्यांनी माहिती दिली. डॉ. गोऱ्हे यांचे खाजगी सचिव रविंद्र खेबुडकर, विधान परिषदचे माध्यम सल्लागार नंदकिशोर लोंढे यावेळी उपस्थित होते.


Tags: Dr.Neelam GorheloksabhaMaharashtraNarhari Zirwalom birlaPride Organisationडॉ.नीलम गोऱ्हेप्राइड संस्थामहाराष्ट्रलोकसभा सचिवालय
Previous Post

महाराष्ट्र दिनापासून कोयना धरणग्रस्तांच्या जमीन वाटपाच्या प्रक्रियेला सुरुवात

Next Post

एड्सग्रस्त काकीकडून पुतण्याला एड्स संक्रमित करण्यासाठी सक्तीनं शरीरसंबंध! पोक्सोसह गंभीर गुन्हा!!

Next Post
UP Police

एड्सग्रस्त काकीकडून पुतण्याला एड्स संक्रमित करण्यासाठी सक्तीनं शरीरसंबंध! पोक्सोसह गंभीर गुन्हा!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!