Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महिला दक्षता समित्यांचे कामकाज प्रभावीपणे व्हावे- डॉ.नीलम गोऱ्हे

महिलांविषयक तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करावी - शंभूराज देसाई

June 19, 2021
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
gorhe & desai

मुक्तपीठ टीम

 

राज्यातील पोलीस प्रशासनाने महिला दक्षता समित्यांचे कामकाज प्रभावीपणे होण्यासाठी लक्ष द्यावे, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिले.

 

विधानभवनात महिलांविषयक विविध प्रश्नांवर दूरदृश्यप्रणालीव्दारे बैठक पार पडली. यावेळी गृह(ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई,पोलीस महासंचालक(महिला विरोधी अत्याचार प्रतिबंधक) राजवर्धन सिन्हा, अकोला, बीड, नगर, सोलापुर, रायगड, अमरावती , चंद्रपुर व संबधित जिल्हयांचे पोलिस अधिक्षक दूरदृश्यप्रणालीव्दारे या बैठकीला उपस्थित होते.

 

उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या, महिला दक्षता समित्यांनी प्रभावीपणे कामकाज करावे याकरिता त्यांना योग्य मार्गदर्शन होणे गरजेचे आहे, कोविडच्या पार्श्वभूमीवर अनेक दिवस न झालेल्या बैठका ऑनलाईन स्वरूपात घ्यावात. महिला दक्षता समित्यांसाठी कार्यपद्धती निश्चित करावी व मार्गदर्शक पुस्तिका तयार करावी. बालविवाह, पोटगी, सोशल मिडीयामधून वेबसाईटवरून होणारी महिलांची फसवणूक, ऊसतोड कामगार जेव्हा कामाकरिता स्थलांतरित होतात तेव्हा त्यांच्या अल्पवयीन मुलींकरिता आरोग्य विभाग, पोलिस यंत्रणा व सामाजिक संघटनांच्या सहकार्यातून विशेष बाब म्हणून लक्ष द्यावे, त्यांच्या काही तक्रारी आल्यास त्याचे तत्काळ निराकरण करावे. मुलींना फुस लावून पळवून नेण्याच्या घटनांचा तत्काळ तपास होणे गरजेचे आहे. जात पंचायतींकडून होणाऱ्या काही घटनांमध्ये तक्रारी येत आहेत वरील सर्व बाबतीत महिलांच्या तक्रारींची तत्काळ दखल घेण्याच्या सूचना डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केल्या.

 

विशाखा समितीची स्थापना: कामाच्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत विशाखा मार्गदर्शक तत्वे अस्तित्वात आहेत. त्याप्रमाणे विशाखा समित्या स्थापन करून तक्रारींचा आढावा घ्यावा.

 

कोरोनाच्या काळात दाखल झालेल्या एफआयआर तपासात अडथळे किंवा तो तपास पूर्ण न झालेल्या ‘बी समरी’ रिपोर्ट झालेल्या केसेसच पुनरावलोकन करून सदरील केसेसचा आढावा घ्यावा व आवश्यकता असल्यास त्यात पुन्हा तपास करावी अशी सूचना डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी केली. याबाबत उचित कार्यवाही करून तपशील सादर करण्याची निर्देश देसाई यांनी पोलीस प्रशासन दिले.

 

महिलांविषयक तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करावी –  शंभूराज देसाई

गृहराज्यमंत्री देसाई म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंधाचे निकष पाळून महिला दक्षता समित्यांच्या बैठका सर्व जिल्हयात आयोजित कराव्यात. उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी दिलेल्या सूचनांसाठी जिथे गृह विभागातील सुधारणांची आवश्यकता आहे तिथे शासनाच्या नियंमानुसार योग्य ती कार्यवाही गृह विभागाने करावी, तसेच सातारा जिल्ह्यात फक्त पत्राव्दारे आलेल्या तक्रारींवरही पोलिसांनी कार्यवाही केली आहे. हा उपक्रम स्तुत्य आहे. महिलांविषयक आलेल्या तक्रारींवर कुठल्याही प्रकारची दिरंगाई न होता तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश राज्यमंत्री देसाई यांनी यावेळी दिले.

 

यावेळी पोलीस ठाणेनिहाय महिलांच्या दक्षता समित्यांची पुनर्रचना करणे, ग्रामीण भागातील कोरोना सेंटर मधील महिला रुग्णांची सुरक्षा, कोविडमुळे अनाथ झालेली बालके, महिला अत्याचार घटनांची घेण्यात येणारी तत्काळ दखल, महिलांसाठी सुरक्षेच्या योजना, प्रत्येक जिल्ह्याने राबविलेले नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती पोलिस विभागाने दिली.


Tags: neelam gorheshambhuraj desaiडॉ.नीलम गोऱ्हेमहिला दक्षता समितीशंभूराज देसाई
Previous Post

आषाढी एकादशीला दहा मानाच्या पालख्यांचा ‘लालपरी’तून प्रवास

Next Post

माझी वसुंधरा अभियानाने वातावरणीय बदलांचे परिणाम नियंत्रित करा

Next Post
aditya thackeray (11)

माझी वसुंधरा अभियानाने वातावरणीय बदलांचे परिणाम नियंत्रित करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!