Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नीलम गोऱ्हे यांनी नगरसेवक धनराज घोगरे यांच्या चौकशीचे दिले आदेश

April 29, 2021
in घडलं-बिघडलं
0
neelam

मुक्तपीठ टीम

 

पुणे मनपा आरोग्य अधिकाऱ्यांवर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खूप मोठा ताण पडत आहे. असे असताना देखील पुणे मनपा आरोग्य प्रमुख डॉक्टर भारती यांच्या दालनांमध्ये भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक धनराज घोगरे यांनी जाऊन संतप्तपणाने जाऊन बरच वादंग केला. त्याचवेळी ते डॉ. वैशाली जाधव यांच्या अंगावर धावून गेले. त्याचा परिणाम म्हणजे अशा मानहानीकारक वर्तनामुळे, अपमानामुळे डॉ.जाधव ह्या भाविववश झाल्या. याबाबत डॉ.जाधव यांनी महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडे सदरील घटनेची माहिती दिली. यात एका बाजूला हॉस्पिटलमधील लसीकरण, कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या या सगळ्यामुळे मोठ्याप्रमाणात कामाचा बोजा आरोग्य यंत्रणेवर आलेला आहे. घोगरे यांच्या वेगळ्या काही मागण्या असतील किंवा एखादे काम झाले नसेल तर कशा प्रकाराने बोलायचे याची आचारसंहिता, शिस्त, नियमावली, माणुसकी पाळणे आवश्यक होते पण घोगरे यांच्या वर्तनामुळे कायद्याला मत हरताळ फासला गेलेला आहे, असे डॉ.गोऱ्हे व्यक्त केले आहे.

 

पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार आणि पुण्यामधले सर्व लोकप्रतिनिधींना या सर्वांची जबाबदारी आहे की, सुरक्षित आणि निर्भय वातावरणामध्ये महिला कर्मचारी, महिला डॉक्टर , आरोग्य कर्मचारी यांना काम करता आले पाहिजे. या दृष्टिकोनातून घोगरे यांच्या कडून वर्तन झाले त्याबद्दल डॉ.गोऱ्हे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे व चौकशी समिती नेमण्याची सूचना मनपा आयुक्त यांना केली आहे. तसेच डॉ जाधव यांची व आरोग्य कर्मचाऱ्यांची घोगरे यांनी दिलगिरी व्यक्त केली पाहिजे असे डॉ.गोऱ्हे यांनी स्पष्ट केले आहे. याबद्दलच्या चौकशी समितीचा अहवाल नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविण्याचे निर्देश देखील दिले आहेत. जेणेकरून घोगरे यांच्या वर्तनाच्या संदर्भात राज्य शासन कारवाई करायची याबद्दल विचार करू शकेल असे देखील डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले आहे.

 

त्याचबरोबर पुणे महापालिकेतील सगळ्या नगरसेवकांनी डॉ जाधव यांच्या प्रकरणात बघाची भूमिका न घेता आणि घोगरे यांचे समर्थन न होता आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याची आवाहन डॉ.गोऱ्हे यांनी केले आहे.

 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व ऊपमुख्यमंत्री अजित पवार, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, आरोग्य मंत्री राजेश टोपे या सर्वांकडे यासंदर्भातील माहिती व निवेदन डॉ.गोऱ्हे यांनी कळविले आहे.

 


Tags: chief minister uddhav thackerayDeputy Chief Minister Ajit PawarDr.Neelam GorheHealth Minister Rajesh TopeMinister Eknath Shindeपुणे मनपा
Previous Post

राज्यातील कोरोना रूग्णालयांच्या विद्युत निरीक्षणाचे नितीन राऊतांचे आदेश

Next Post

अरे व्वा बाळासाहेब! ५ हजार कर्मचाऱ्यांचा लसीकरण खर्च मुख्यमंत्री निधीत! काँग्रेस आमदारांचे वेतनही!!

Next Post
balasaheb thorat

अरे व्वा बाळासाहेब! ५ हजार कर्मचाऱ्यांचा लसीकरण खर्च मुख्यमंत्री निधीत! काँग्रेस आमदारांचे वेतनही!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!