मुक्तपीठ टीम
लक्ष्मी चंचल असते असं म्हणतात. जगातील आणि भारतातील श्रीमंतांच्या यादीवर नजर टाकली तर हे सहजच कळतं. गुरुवारी अंबानी हे मागे पडले होते आणि गौतम अदानी हे भारतातील सर्वात मोठे अब्जाधीश ठरले आहेत. त्यामुळे ते झुकेबर्गनाही मागे टाकत जगातील टॉप १० श्रीमंतांच्या यादीमध्येही अदानींनी स्थान मिळवले. परंतु शुक्रवारी फोर्ब्सच्या रिअल टाईम बिलियनेअर इंडेक्सनुसार मुकेश अंबानी अदानींना मागे टाकत पुढे गेले. त्यामुळे ते भारतातील सर्वात श्रीमंत ठरले.
जाणकारांच्या मते, अंबानी आणि अदाणींमधील श्रीमंत नंबर १ची ही स्पर्धा खूपच अटीतटीची झाली आहे. शुक्रवारी दिवसभर अंबानी-अदानी यांच्यातील क्रमांक एकची शर्यत सुरूच राहणार आहे कारण, दोघांच्या एकूण संपत्तीमध्ये फारच कमी फरक आहे. काही शेअर्सच्या मूल्यांमधील बदल त्यांचे स्थान बदलतं ठेवण्याची शक्यता आहे.
फेसबुकचे झुकेरबर्ग टॉप-१० मधून बाहेर!
- गुरुवारी, मार्क झुकरबर्गची एकूण संपत्ती २९ अब्ज डॉलर झाली.
- मेटा प्लॅटफॉर्म्स इंकच्या स्टॉकमध्ये एका दिवसात विक्रमी घसरण झाली. त्यामुळे त्यांनी स्थान गमावले. तर मुकेश अंबानी यांच्या संपत्तीतही गुरुवारी १.२ अब्ज डॉलर्सची घट झाली.
- याचा फायदा अदानींना झाला आणि त्यांनी १०व्या स्थानावर झेप घेतली.
- अंबानी ११ व्या क्रमांकावर गेले.
- मार्क झुकेरबर्ग यांना सर्वात मोठा झटका बसला आहे.
- अॅमेझॉनचे अब्जाधीश जेफ बेझोस यांची संपत्ती ११.८ अब्ज डॉलरने कमी झाली आहे.
झुकेरबर्गच्या एकदिवसीय संपत्तीतील घसरण ही आतापर्यंतची सर्वात मोठी
- Refinitiv डेटानुसार, बेझोस, ई-कॉमर्स रिटेलर Amazon चे संस्थापक आणि चेअरमन यांच्याकडे कंपनीची सुमारे ९.९% मालकी आहे. फोर्ब्सनुसार ते जगातील तिसरा सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे.
- फोर्ब्सच्या मते, एका वर्षापूर्वीच्या तुलनेत २०२१ मध्ये बेजोस यांची एकूण संपत्ती ५७% वाढून १७७ अब्ज डॉलर्सवर पोहोचली, हे मुख्यत्वे महामारीच्या काळात अॅमेझॉनच्या तेजीमुळे, जेव्हा लोक ऑनलाइन खरेदीवर जास्त अवलंबून होते.
- झुकेरबर्गच्या एकदिवसीय संपत्तीतील घसरण ही आतापर्यंतची सर्वात मोठी आहे आणि टेस्ला इंकचे एलॉन मस्क यांनी नोव्हेंबरमध्ये ३५ अब्ज डॉलर्सचे एक-दिवसीय पेपर नुकसान पोस्ट केल्यानंतर आले आहे.