मुक्तपीठ टीम
शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ देशव्यापी बंद पुकारण्यात आला असून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी काळीफित लावून या बंदला पाठिंबा दर्शविला.
राष्ट्रवादी काँग्रेसची संवाद यात्रा आज औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे असून संवाद यात्रेतील कार्यक्रमात ‘भारत बंद’ला प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील व उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काळीफित लावून पाठिंबा दर्शविला.
संयुक्त किसान मोर्चाने मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात आज भारत बंदची हाक दिली होती. याला राष्ट्रवादी काँग्रेसने संपूर्ण पाठिंबा दिला आहे.