मुक्तपीठ टीम
गुजरातमधील मुंद्रा बंदरानंतर आता गुजरात येथिल द्वारकाच्या खंभालियामध्ये तब्बल साडे तीनशे कोटींचे ड्रग्स जप्त करण्यात आलं आहे. त हेरॉईन आणि एमडी ड्रग्सचा समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे या ड्रग्सची पाकिस्तानातून तस्करी करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळतेय.याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी भाजपाला टोला लगावला आहे.
ड्रग्सचा खेळ गुजरातमधून तर सुरू नाही ना?
- नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत भाजपावर टीका केली आहे.
- द्वारकात साडेतीनशे कोटीचे ड्रग्स पकडले आहे.
- मनिष भानुशाली, धवल भानुशाली, केपी गोसावी आणि सुनील पाटील हे सर्व जण अहमदाबादच्या नोवाटल आणि फाईव्ह स्टार हॉटेलात होते.
- गुजरातच्या मंत्र्यासोबत त्यांचे फोटो आहेत.
- हे लोक गुजरातमधून ड्रग्स रॅकेट ऑपरेट करत आहेत.
- ड्रग्सचा खेळ गुजरातमधून तर सुरू नाही ना?
या ड्रग्सचे खिलाडी गुजरातमध्ये
- महाराष्ट्रात दोन ग्राम ड्रग्स पकडल्यास बॉलिवूडकरांची परेड केली जाते.
- पण गुजरातमध्ये सागरी मार्गाने किलोच्या किलो ड्रग्स आणले जात आहेत.
- त्यामुळे या प्रकरणाची चौकशी योग्य दिशेने व्हावी.
- यात कोणत्या पक्षाचा नेता आणि कार्यकर्ता आहे याकडे दुर्लक्ष करून एनसीबी आणि एनआयएने चौकशी करावी.
- देशाला नशामुक्त करण्यासाठीच १९५०चा कायदा बनवला होता.
- गुजरातमधूनच सर्व खेप येत आहे.
- या ड्रग्सचे खिलाडी गुजरातमध्ये आहेत.
- त्यामुळे त्याची चौकशी करावी.
- गुजरात कनेक्शन काय आहे ते समोर यावं.
- गुजरातमध्ये दुसऱ्यांदा मोठ्या प्रमाणावर ड्रग्स सापडलं आहे.
- त्यात मनिष भानुशाली, धवल भानुशाली, केपी गोसावी आणि सुनील पाटील यांचं या प्रकरणाशी काही कनेक्शन आहे का? याचीही चौकशी झाली पाहिजे.
महाराष्ट्रातील पाव ग्रॅमवाल्यांनी गुजरातेतील शेकडो किलोंचा अभ्यास करावा! – संजय राऊत
- द्वारकेत ड्रग चिंतेची बाब आहे.
- राज्यात पाव ग्रॅम सापडले.
- आता वानखेडेंनी तिकडे पाहावे.
- आता त्यात गुजरातमधील श्रीमंतांची मुलं, सिनेसृष्टीतील लोकं आहेत का ते एनसीबीनं पाहावं.
- महाराष्ट्रात पाव ग्रॅम ड्रग्स शोधणाऱ्यांनी ३५० कोटींच्या ड्रग्सचा अभ्यास करावा.