मुक्तपीठ टीम
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र पूरग्रस्तांना शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी व त्यांच्या सहकार्यांनी अत्यावश्यक वस्तूंची मदत पाठविली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री छगनरावजी भुजबळ यांच्या हस्ते झेंडा दाखवत सदरची मदत पूरग्रस्त भागात पाठविण्यात आली. यावेळी प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, नानासाहेब महाले, जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार, कोंडाजीमामा आव्हाड, बाळासाहेब कर्डक, कविता कर्डक, संजय खैरनार, अनिता भामरे, महेश भामरे, मकरंद सोमवंशी आदि पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्यातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांच्या घरातील संस्कार पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. पूरग्रस्त बांधवाना त्यांचे संसार उभे करण्यासाठी त्यांना मदत म्हणून आपण त्यांच्या सोबत उभा रहाणे आवश्यक आहे. याच विचारातून पूरग्रस्तांच्या मदतीकरिता राष्ट्रवादी युवक काँग्रेस सरसावली असून विविध प्रकारच्या माध्यमातून पूरग्रस्तांना मदत करण्यात येत आहे. पूरग्रस्त भागात सर्वत्र चिखल पसरला असल्याने पूरग्रस्तांना शिजवलेले अन्न मिळू शकत नसल्याने युवक राष्ट्रवादीने बिस्कीट व पाणी बॉटलचे बॉक्स पाठविले आहेत.
पूर ओसरला असला तरीही सदर भागात चिखलगाळ अजूनही आहे. तो काढण्यासाठी झाडू, खराटे तसेच अन्य सामग्रीची गरज भासत आहे. दुकाने बंद असल्यामुळे ही सामग्री कुठून आणायची हा प्रश्न पडत असल्याने फावडे, पाटी, ग्लोज, फिनेल व खराटा पाठविण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून अनेकजण नेसत्या कपड्यांसह राहत असल्याने त्यांना इतर आजार होऊ नये याकरिता आरोग्याची काळजी घेत माता- भगिनींना साड्या तसेच लहान मुलांना व ज्येष्ठ नागरिकांना सर्दीचा त्रास होऊ नये याकरिता लहान मुले व वयोवृद्धांसाठी उबदार अंथरुणांकरिता ब्लँकेट पाठीवण्यात आले आहे. मासिक पाळीदरम्यान महिलांना त्रास होऊन इतर आजार जडू नयेत याकरिता सॅनिटरी नॅपकिन्सची मदत करण्यात आली आहे. यासोबत कपडे धुण्याचे व अंघोळीचे साबण, टूथपेस्ट, ब्रश यासारख्या अत्यावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली आहे. पूरग्रस्तांना कोरोना विषाणूची बाधा होऊ नये याकरिता मास्क व सॅनिटाझरचा समावेश ही यात करण्यात आला आहे.
पूरग्रस्तांना मदतीकरिता जय कोतवाल, राहुल तुपे, नितीन-बाळा निगळ, निलेश भंदुरे, विशाल डोखे, सोनू वायकर, संतोष जगताप, सागर बेदरकर, रामदास मेदगे, राहुल कमानकर, कल्पेश कांडेकर, किरण पानकर, डॉ.संदीप चव्हाण, राहुल घोडे, सचिन मोगल, संदीप गांगुर्डे, सुनिल घुगे, अक्षय पाटील, भूषण गायकवाड, संदीप खैरे, कल्पेश जेजुरकर, प्रफुल्ल पाटील, उदय सराफ, चेतन दिघे, विजय देवरे, वैजनाथ कड, संतोष गोवर्धने, कुणाल घस्टे, चेतन काळे, जानू नवले, भावेश निर्वाण, राजेश्वर साळुंखे, कैलास दीरवाणी आदींनी पुढाकार घेतला.