Tuesday, June 3, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आघाडीची बिघाडी: काँग्रेसविरोधात राष्ट्रवादी भाजपासोबत! काँग्रेसने भाजपा फोडली!

राष्ट्रवादीऐवजी काँग्रेसला साथ दिल्याने माजी आमदाराची भाजपामधून हकालपट्टी

May 11, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
ncp bjp alliance for zp power, congress breaks bjp

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या आघाडीची सत्ता आहे. मात्र भंडारा आणि गोंदियात राष्ट्रवादी काँग्रेसने आपला मित्र पक्ष काँग्रेसला एकटं पाडून सत्तेसाठी भाजपाशी युती केली आहे. यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादीने आमच्या पाठीत सुरा खुपसला अशा शब्दात संताप व्यक्त केला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीला धडा शिकवण्यासाठी काँग्रेसनेही भंडाऱ्यात भाजपाचा एक गट फोडत आपली सत्ता आणली आहे. राज्यात राष्ट्रवादीला कडवट विरोध करणाऱ्या भाजपाने दोन जिल्ह्यांमध्ये त्याच पक्षाशी युती केली, पण माजी आमदार चरण वाघमारे यांनी राजकीय सोयीसाठी काँग्रेसला साथ देताच त्यांच्यावर मात्र कारवाई केली आहे.

राष्ट्रवादीने आमच्या पाठीत सुरा खुपसला…

  • नाना पटोले म्हणाले की, “राष्ट्रवादीने अनेक ठिकाणी भाजपासोबत युती करत सत्ता स्थापन केली आहे.
  • आम्ही यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि प्रफुल पटेल यांच्या सोबत चर्चा केली.
  • त्यानंतरही राष्ट्रवादीने प्रत्येक ठिकाणी भाजपसोबत युती केली.
  • गोंदिया जिल्हा परिषदमध्येसुध्दा राष्ट्रवादीने भाजपसोबत जात युती केली.
  • राष्ट्रवादीने आमच्या पाठीत सुरा खुपसला.
  • गोंदियामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीनं एकत्र येऊन काँग्रेसला एकटं पाडलं.
  • तिथं अध्यक्षपदासाठी भाजपचे पंकज रहांगडाले आणि उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या यशवंत गणवीर यांची निवड झाली.

नाना पटोले यांनीही भाजपाचा एक गट फोडला!!

  • भंडारा आणि गोंदियात राष्ट्रवादीने मित्र पक्ष काँग्रेसची साथ सोडून भाजपाबरोबर हात मिळवणी केली.
  • यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या भंडारा जिल्ह्यातच महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे.
  • मात्र नाना पटोले यांनीही भाजप मधील एक गट फोडला.
  • भाजपच्या चरण वाघमारे गटाने काँग्रेसला साथ दिली आणि त्या ठिकाणी अध्यक्षपद हे काँग्रेसला मिळालं. तर उपाध्यक्ष हे चरण वाघमारे गटाला मिळालं.
  • भंडारा जिल्हा परिषदेत काँग्रेसचे २१, भाजपाचे १२, राष्ट्रवादी काँग्रेसचे १३ आणि शिवसेनेचा एक असं संख्याबळ आहे.

चरण वाघमारेची भंडारा भाजपातून हकालपट्टी!

  • माजी आमदार चरण वाघमारेची भंडारा भाजपातून सहा वर्षासाठी हकालपट्टी करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.
  • आजच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीत   टरगटाने नाना पटोलेंना साथ दिल्याने भाजपने ही कारवाई केली आहे.

तेव्हा खंजीर कोणी खुपसला? – आशिष मेटे

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्य चिटणीस आशिष मेटे यांनी नाना पटोलेंना चार वर्षांपूर्वीचं राजकारण आठवण्यास सांगितलं आहे. तेव्हा राष्ट्रवादीऐवजी काँग्रेसने भाजपाशी हातमिळवणी करत सत्ता मिळवली होती, असा मेटेंचा दावा आहे.

मैत्रीचा हात…पाठीत खंजीर बरररर

गोंदिया जिल्ह्यातील हि चार वर्षापुर्वीची बातमी वाचा आणि ती पण जिल्हा परिषद निवडणुकीचीच.

करुन सवरुन नामनिराळं राहुन @NCPspeaks च्या नावाने बोंबाबोंब करुन फुटेज घ्यायचे बंद केले तर खुप चांगले होईल @NANA_PATOLE जी.@praful_patel @Jayant_R_Patil https://t.co/I2cEWswDby pic.twitter.com/K0UA0aUfCe

— Ashish Sarala Anandrao Mete (@IAshishMete) May 11, 2022


Tags: BJPchandrashekhar bawankuleCharan WaghmareCongressjayant patilnana patoleNCPकाँग्रेसचरन वाघमारेभाजपाराष्ट्रवादी काँग्रेस
Previous Post

सातव्या वेतन आयोगानुसार वेतन फरकाचा दुसरा हप्ता शिक्षकांना कधी मिळणार?

Next Post

राजद्रोह गुन्ह्यांचं वास्तव: पाच वर्षात ३२६ गुन्हे, शिक्षा फक्त सहाच गुन्ह्यात!

Next Post
supreme court

राजद्रोह गुन्ह्यांचं वास्तव: पाच वर्षात ३२६ गुन्हे, शिक्षा फक्त सहाच गुन्ह्यात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!