मुक्तपीठ टीम
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी समीर वानखेडे हे मुस्लिम असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक सातत्याने करत आहेत. यासंबंधित ते पुरावेही सातत्याने देत आहेत. मात्र आता पुन्हा नवाब मलिकांनी समीर वानखेडेंचे छायाचित्र पोस्ट करत ‘यह क्या किया तुने समीर दाऊद वानखेडे? कबूल है, कबूल है, कबूल है…असे कॅप्शनही दिली आहे. या फोटोमध्ये समीर वानखेडे हे निकाह करारनाम्यावर सही करताना दिसत आहेत, असा मलिकांच्या ट्वीटचा अर्थ आहे.
निकाहनामा खरा निघाला तर वानखेडेंवरील फसवणुकीचा आरोप…कबूल है…कबूल है…कबूल है!
- समीर वानखेडे हे हिंदू दलित नसून मुस्लिमच असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे.
- त्यांनी याबाबत अनेकदा पत्रकार परिषद घेऊन काही पुरावे देखील सादर केले आहेत.
- पुन्हा एकदा मलिक यांनी समीर वानखेडे यांच्याविरोधात मोठा फटाका फोडला आहे.
- त्यांनी वानखेडे यांचा ट्वीटरवर एक छायाचित्र पोस्ट केला आहे.
- या छायाचित्रात समीर वानखेडे निकाह करारनाम्यावर सही करताना दिसत आहेत.
- हे छायाचित्र पोस्ट करतानाच मलिक यांनी ‘यह क्या किया तुने समीर दाऊद वानखेडे?’ कबूल है, कबूल है, कबूल है… असे कॅप्शन देखील दिले आहे.
कबूल है, कबूल है, कबूल है…
यह क्या किया तुने Sameer Dawood Wankhede ? pic.twitter.com/VaVMZbrNo0— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 21, 2021
दरम्यान, मलिक यांच्या कन्या निलोफर मलिक खान आणि सना मलिक शेख यांनी देखील रविवारी वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाशी संबंधित विवाहाचा दाखला आणि लग्नाच्या स्वागत सोहळ्याची निमंत्रण पत्रिका पोस्ट केली होती.