मुक्तपीठ टीम
राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. मात्र तब्बल आठ तासाच्या चौकशीनंतर झालेल्या अटकेनंतर नवाब मलिक ईडीच्या कार्यालयाबाहेर आले तेव्हा मलिकांच्या चेहऱ्यावर तणाव नव्हता. ते हसतमुखाने बाहेर आले. त्यांनी हात उंचावून त्यांच्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना अभिवादन केले. यावेळी त्यांनी “लढणार आणि जिंकणार, घाबरणार नाही!” अशी प्रतिक्रिया दिली. मलिकांना वैद्यकीय तपासणीसाठी जे.जे. रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्यानंतर त्यांना न्यायालयात नेण्यात येण्याची शक्यता आहे. अनिल देशमुखांनंतर मंत्रीपदावर असताना अटक झालेले मलिक हे दुसरे मंत्री आहेत.
लढेंगे आणि जितेंगे डरेंगे नही- नवाब मलिक
- तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक ईडीच्या कार्यालयाबाहेर पडले.
- त्यावेळी नवाब मलिक यांच्या चेहऱ्यावर हसू होते.
- त्यांनी हात उंचावून कार्यकर्त्यांना अभिवादन केले.
- त्यावेळी त्यांनी माध्यमांना लढणार आणि जिकणार घाबरणार नाही अशी प्रतिक्रिया दिली.
- नवाब मलिक यांचे जेजे रुग्णालयात अर्धा तास मेडिकल होईल.
- त्यानंतर नवाब मलिक यांना मुंबई सेशन्स कोर्टात हजर केले जाईल.
- याठिकाणी दोन्ही बाजूच्या वकिलांकडून युक्तिवाद केला जाईल.
नवाब मलिक यांच्या अटकेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. दाऊद इब्राहिमच्या मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात नवाब मलिक यांचाही सहभाग असल्याचा पुरावे सापडले असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. बुधवारी पहाटे साडे चारच्या सुमारास ईडी अधिकारी मलिक यांच्या घरी दाखल झाले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवाब मलिक यांच्या भावाला ईडीन चौकशीसाठी नवाब मलिक ईडी कार्यालयाबाहेर हसत- हसत बाहेर, म्हणाले लढणार आणि जिंकणार घाबरणार नाही