Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नवाब मलिक म्हणतात, “आघाडी सरकारनं २ वर्षात खूप केलं…बोलणं कमी, काम जास्त!”

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
Nawab Malik

मुक्तपीठ टीम

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. दोन वर्षांपूर्वी या दिवशी ठाकरे सरकारनं सत्तेवर आलं होतं. आघाडी सरकारच्या द्वितीय वर्षपूर्तीबद्दल बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी कारभाराबद्दल माहिती दिली आहे. हे सरकार बोलणारं नाही तर करणारं सरकार असल्याचे ते म्हणालेत.

 

काम करायचं नाही, केवळ प्रसिद्धी करायची. ते धोरण आमचं नाही!

  • नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारबद्दलचे आपले मत मांडताना भाजपवर निशाणा साधला.
  • दोन वर्षांपूर्वी आघाडीचं सरकार स्थापन झालं.
  • आजच्या दिवशी मुख्यमंत्र्यांसह पाच मंत्र्यांनी शिवतीर्थावर शपथ घेतली.
  • त्या दिवसापासून जनतेला न्याय देणं आणि महाराष्ट्राला पुढे नेण्याचा दृष्टीकोण आम्ही ठेवला आहे.
  • नैसर्गिक आपत्ती आणि मानव निर्मित आपत्ती निर्माण झाल्यावरही आमच्या सरकारने यशस्वीपणे परिस्थिती हाताळली आहे.
  • आम्ही दोन वर्षात काहीच काम केलं नाही असं काही लोक म्हणत आहेत. पण या दोन वर्षात आम्ही काटकसरीचं धोरण स्वीकारलं.
  • कोणत्याही कामाचा जास्त गाजावाजा करायचा नाही असे ठरवले.
  • जेव्हा काटकसरीचं धोरण स्वीकारतो तेव्हा कामगिरी कमी आणि गाजावाजा जास्त असं आम्ही करत नाही.
  • उत्तर प्रदेशात छोटं काम होतं पण मुंबईतल्या वर्तमानपत्रात जाहिराती येतात.
  • आमचं धोरण आहे, बाते कम, काम ज्यादा. इतरांचं धोरण, काम करायचं नाही, केवळ प्रसिद्धी करायची. ते धोरण आमचं नाही.

 

मागील सरकारची आश्वासने, महाविकास आघाडीने ती पूर्ण केली

  • महाविकास आघाडीच्या दोन वर्षांच्या सत्तेत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
  • मागील सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. पण तीन वर्ष त्यांना कर्जमाफी करता आली नाही.
  • शेतकरी आंदोलन करत राहिले. त्यांना शेतकऱ्यांना न्याय देता आला नाही.
  • आमचे सरकार आले. पहिल्याच कॅबिनेटमध्ये कर्जमाफी केली. दोन लाखांचे कर्ज घेणाऱ्यांना दोन महिन्याच्या आत कर्ज माफ केले. वीस हजार कोटींचे कर्ज माफ केले.
  • दोन लाखांवर ज्यांनी कर्ज घेतले, त्यांना आश्वासन दिले आहे. भविष्यात त्यांचा विचार करू.
  • ज्यांनी नियमित कर्ज भरले त्यांचाही विचार होणार आहे. कोरोनामुळे आर्थिक ताण आला. पण आता त्यावरही निर्णय घेऊ, असे नवाब मलिक म्हणाले.

 

कोरोनात इतर राज्यात जे घडलं ते महाराष्ट्रात घडलं नाही!

  • कोरोना काळात काही राज्यांमध्ये स्मशानभूमीत जागा कमी पडल्याने मृतदेह नदीत टाकले. गंगेशेजारी दफन केले. तसे कुठेही महाराष्ट्रात करण्यात आले नाही.
  • देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात होते, तरीही इतर राज्यांसारखी परिस्थिती आपल्या राज्यात झाली नाही.
  • लोकांचा मृत्यू झाला. पण मृतदेहांची अवहेलना झाली नाही आणि अंतिम संस्कार क
    रण्याचीही व्यवस्था होती.

Tags: cm uddhav thackerayMaha Vikas Aghadi GovernmentMaharashtramva governmentNawab MalikShivsenaभाजपामंत्री नवाब मलिकमहाराष्ट्रमहाविकासआघाडी सरकारमुख्यमंत्री उद्धव ठाकरेशिवसेना
Previous Post

रुग्णालये, कोविड केंद्रांच्या इमारतीचे संरचनात्मक, अग्निशमन, आणि विद्युत ऑडिट करा!

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘मन की बात’: प्रदूषणावर मात करणारे एअर फिल्टर शोधणाऱ्या मयूर पाटीलशीही केली चर्चा

Next Post
PM man k baat

पंतप्रधान नरेंद्र मोदींची 'मन की बात': प्रदूषणावर मात करणारे एअर फिल्टर शोधणाऱ्या मयूर पाटीलशीही केली चर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!