मुक्तपीठ टीम
मला आजही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं असं विधान राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईतील एका कार्यक्रमात केले आहे. या विधानाने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. मात्र यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीसांना प्रत्त्युतर दिलं आहे. मुख्यमंत्री आहोत हे मनातून काढा विरोधी पक्षनेते हे पद ही कमी नाही, असे प्रत्युत्तर नवाब मलिक यांनी केले आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
- देवेंद्र फडणवीस आज नवी मुंबईत होते.
- यावेळी एका कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी हे विधान करून पुन्हा एकदा राजकीय चर्चांना तोंड फोडले आहे.
- मला अस वाटतच नाही की मी मुख्यमंत्री नाही.
- मला जनतेने कधीच जाणवू दिलं नाही की मी मुख्यमंत्री नाही.
- मी आजही मुख्यमंत्री आहे हेच तुम्ही मला जाणवून दिलं आहे.
- मला तर वाटतं मी आजही मुख्यमंत्रीच आहे.
- गेले दोन वर्ष सातत्यानं राज्यभर फिरतोय.
- लोकांचं प्रेम अजिबात कमी झालेलं नाही.
- माणूस कोणत्या पदावर आहे ते महत्त्वाचं नाही.
- तो काय काम करतो हे जास्त महत्त्वाच.
जनतेनेही मी मुख्यमंत्री नसल्याचं जाणवू दिलं नाही
- गेली दोन वर्ष एकही दिवस घरात न थांबता मी जनतेच्या सेवेमध्ये आहे.
- त्यामुळे मला जनतेनेही कधी मी मुख्यमंत्री नसल्याचं जाणवू दिलं नाही.
- विरोधी पक्षनेता म्हणून मी उत्तम करत आहे.
- ज्या दिवशी मला जनतेचा आशीर्वाद मिळेल त्या दिवशी इथे मी देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी येईल.
- त्यामुळे त्याची काळजी घेऊ नका.
- मी नक्की येईल.
- तुमचं निमंत्रण मी आजच स्विकारतो.
फडणवीसांना नवाब मलिकांचा टोला
- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी फडणवीसांच्या ‘मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतंय’ची खिल्ली उडवली आहे.
- मुख्यमंत्री नाही, हे मनातून काढून टाका. विरोधी पक्षनेतेपदही तितकंच मोठं आहे.
- मला वाटतं दोन वर्ष होऊन गेली आहेत.
- पण ते मुख्यमंत्रीपदाच्या मानसिकतेतून बाहेर पडताना दिसत नाहीत.
- विरोधी पक्ष नेत्याच्या भूमिकेत त्यांनी काम केलं पाहिजे.
- ते मुख्यमंत्री नाहीत हे त्यांनी मनातून काढलं पाहिजे.
- विरोधी पक्षनेतेपद सुद्धा मोठं आहे.
- ते पद मुख्यमंत्रीपदापेक्षा कमी नाही हे त्यांना कळलं पाहिजे!