मुक्तपीठ टीम
“एका अभिनेत्रीने ओशिवरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आत्महत्या केली होती. आता त्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासात तिच्याकडून एनसीबीचे नकली अधिकारी बनून पैसे वसूल करत असल्याचे उघड झाले आहे. तिने बदनामीच्या भीतीने आत्महत्या केली”, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. या प्रकरणातील गोसावी, भानुशाली सारख्यांच्या एनसीबी अधिकाऱ्यांच्या प्रायव्हेट आर्मीच्या अँहलने तपासाची मागणी मलिक यांनी केली आहे.
An actress has committed #suicide within the limit of Oshiwara Police station. In the investigation, it has come to light that some people were extorting money by posing as NCB officers. (1/2) pic.twitter.com/lSc9G6Htkj
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) December 26, 2021
नवाब मलिकांचे नवे आरोप, नवी खळबळ!
एका अभिनेत्रीने ओशिवरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आत्महत्या केली होती. तपासात उघड झाले आहे की, काही लोक एनसीबीचे नकली अधिकारी बनून धमकावून पैसे वसुलीचे काम करत आहे. बदनामीच्या भीतीने त्या अभिनेत्रीने आत्महत्या केली. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी मुंबई शहरात प्रायव्हेट आर्मी बनवली होती, हे तर वास्तवच आहे. त्यामाध्यमातून वसुलीचे मोठे काम चालू होते. गोसावी, भानुशालीसारख्यांच्या कारवाया उघड झाल्या. या प्रकरणातही प्रायव्हेट आर्मीच्या अँगलने तपास झाला पाहिजे. प्रायव्हेट आर्मी मुंबईत मोठ्या प्रमाणावर वसुलीचे काम करत होते.