Monday, March 9, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नवाब मलिकांचा एनसीबी-बीजेपीवर हल्लाबोल! व्हिडीओ आणि फोटो शेअर करत धक्कादायक गौप्यस्फोट!

भाजपा नेते मोहित कंबोजचा मेहुणा रिषभ सचदेवासह दोघांना ड्रगपार्टीतून ताब्यात घेऊन का सोडले?

October 9, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
ncp

मुक्तपीठ टीम

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी शुक्रवारी जसं सांगितलं तसंच शनिवारी केलं. त्यांनी व्हिडीओ आणि फोटोंचे पुरावे सादर करत एनसीबी आणि बीजेपीवर हल्ला चढवला. क्रुझवरील ड्रग्ज पार्टीत १३०० लोकांमधून ११ लोकांना NCB ने ताब्यात घेतले होते मात्र त्यातील तीन जणांना NCB ने का सोडले, असा सवाल मलिक यांनी विचारला. तसेच रिषभ सचदेवा हा भाजपचे नेते मोहित कंबोज यांचा मेहुणा असल्याने सोडण्यात आल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी पत्रकार परिषदेत करुन पुन्हा एकदा भाजप आणि NCB कनेक्शनचा आरोप केला आहे.

 

६ ऑक्टोबर रोजी नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन NCB – भाजप कनेक्शन असल्याचा आरोप केला होता. आज नवाब मलिक यांनी भाजप युवा मोर्चाचे मोहित कंबोज यांच्या मेहुण्याला ताब्यात घेऊनही सोडल्याचा व्हिडीओ माध्यमांसमोर मांडून खळबळ उडवून दिली आहे.

 

नवाब मलिकांचा पुरावा बॉम्ब!

  • रिषभ सचदेवा, प्रतिक गाभा, अमीर फर्निचरवाला या तिघांना ताब्यात घेताना आणि त्यांच्या नातेवाईकांसोबत NCB च्या कार्यालयातून बाहेर पडतानाचा व्हिडीओही नवाब मलिक यांनी माध्यमांसमोर मांडला.
  • रिषभ सचदेवा याला बाहेर सोडताना त्यांचे वडील आणि काका सोबत होते.
  • या तीन व्यक्तींचे नातेवाईक NCB च्या कार्यालयात आले कसे?
  • त्यामुळे रिषभ सचदेवाचे वडील आणि काका व झोनल अधिकारी समीर वानखेडे यांचे मुंबई पोलिसांनी कॉल डिटेल्स चेक करणे आवश्यक आहेत.
  • त्यामुळे संपूर्ण सत्य बाहेर येईल असेही नवाब मलिक म्हणाले.

कंबोजच्या नातेवाईकांच्या सुटकेसाठी दिल्लीतून आदेश

  • क्रुझवर १३०० लोकांवर धाड टाकण्यात आली.
  • ही धाड १२ तास सुरू होती.
  • त्यातील ११ लोकांना ताब्यात घेतले.
  • त्यानंतर अकरा जणांना NCB च्या कार्यालयात आणले होते.
  • परंतु त्यापैकी तीन लोकांना सोडण्याचा आदेश दिल्लीवरून नेत्यांनी केल्याचा खळबळजनक आरोपही नवाब मलिक यांनी यावेळी केला.

 

क्रुझवरील धाड हा सेलिब्रिटींना बोलवून अडचणीत आणण्याचा डाव

क्रुझवरील ही धाड ठरवून केलेला फर्जीवाडा होता. सेलिब्रिटींना बोलावून त्यांना अडचणीत आणण्याचा हा प्रकार होता. त्यामुळे NCB चे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांनी ‘त्या’ तिघांना का सोडले आणि कुणाच्या सांगण्यावरून सोडले याचा खुलासा करावा अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.

 

ड्रग पार्टीतून ताब्यात घेतलेल्यांचे नातेवाईक एनसीबी कार्यालयात कसे?

रिषभ सचदेवा याला बाहेर सोडताना त्यांचे वडील आणि काका सोबत होते. या तीन व्यक्तींचे नातेवाईक NCB च्या कार्यालयात आले कसे. त्यामुळे रिषभ सचदेवाचे वडील आणि काका व झोनल अधिकारी समीर वानखेडे यांचे मुंबई पोलिसांनी कॉल डिटेल्स चेक केले तर संपूर्ण सत्य बाहेर येईल असेही नवाब मलिक म्हणाले.

 

केंद्रातील भाजप नेत्यांच्या दबावाखाली तिघांना सोडण्यात आले आहे. NCB च्या कारवाईत सुरुवातीपासून भाजपचे कनेक्शन होते हे सिद्ध झाले आहे. हे सगळं न्यायालयात सिद्ध होईलच परंतु जनतेच्या न्यायालयातही आले पाहिजे म्हणून हे प्रकरण मांडल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

 

ज्यांच्यावर आरोप त्यांनाच कशी माहिती देणार?

ज्या एजन्सीबद्दल सवाल उपस्थित करण्यात आले असताना त्याच एजन्सीला कशी माहिती देणार असा सवाल विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांना करतानाच याबाबत एखादे कमिशन नेमा अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली.

 

लोकसेवक म्हणवणाऱ्यांनी उत्तर द्यावे!

NCB ने पत्रकार परिषद घेऊन आम्ही केलेले आरोप फेटाळून लावले आणि माझ्या जावयाला अटक केल्यामुळे त्यांनी हे केल्याचा आरोप केला. मात्र मी सुरुवातीपासून न्यायालयावर विश्वास ठेवून आहे. न्यायालयात जावई आपले निर्दोषत्व सिध्द करेल. मी पहिल्या पत्रकार परिषदेत सवाल उपस्थित केला त्यावेळी न्यायालयात जाऊन दाद मागा असे सांगण्यात आले. आताही काही सवाल उपस्थित केले आहेत. जे लोकसेवक म्हणवून घेत आहेत त्यांनी या सवालांचे उत्तर दिले पाहिजे असेही नवाब मलिक म्हणाले.

 

मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे!

दरम्यान हे प्रकरण गंभीर असून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी यामध्ये लक्ष द्यावे अशी मागणीही नवाब मलिक यांनी यावेळी केली.

 

क्लिक करा आणि वाचा एनसीबी काय सांगते – ड्रग पार्टी कारवाई प्रकरणी राष्ट्रवादीच्या मलिकांचे आरोप निराधार आणि चुकीचे!

 

भाजपाच्या वर्तुळात पडलेलं कोडं…तरीही वादग्रस्त मोहित कंबोज का नेत्यांचे लाडके?


Tags: BJPchief minister uddhav thackeraymumbai policeNawab MalikNCBNCPएनसीबीनवाब मलिकप्रविण दरेकरभाजप युवा मोर्चाचे मोहित कंभोजमुख्यमंत्री उध्दव ठाकरेराष्ट्रवादी काँग्रेसरिषभ सचदेवा
Previous Post

“अजित पवारांशी संबंधित आयकर छाप्यांचा भाजपाशी संबंध जोडणे हास्यास्पद”

Next Post

आर्यन शाहरुख खानला किला कोर्टात का नाही मिळाला जामीन? समजून घ्या कायदा आणि वकिलांचा युक्तिवाद…

Next Post
aryan khan

आर्यन शाहरुख खानला किला कोर्टात का नाही मिळाला जामीन? समजून घ्या कायदा आणि वकिलांचा युक्तिवाद...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!