Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

देवेंद्र फडणवीसांविरोधात नवाब मलिकांचे गुन्हेगार संरक्षणाचे महास्फोटक आरोप

"बनावट नोटांचं रॅकेट, बांगलादेशींना मदत, गुन्हेगारांना सरकारी पदं आणि डी कंपनीच्या गुंडाला पंतप्रधानांच्या कार्यक्रमात प्रवेश!"

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
nawab malik pc on fadanvis

मुक्तपीठ टीम

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी रविवारी भाजपाशी आपलं युद्ध नसल्याचं सांगत काहीशी नरमाईची भूमिका घेतली होती. मात्र, मंगळवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मलिकांवर १९९३च्या बॉम्बस्फोटातील आरोपींशी संबंधांचा आरोप केला. त्यामुळे अपेक्षेप्रमाणेच मलिकांनी फडणविसांविरोधात गुन्हेगारी संबंधांच्या आरोपांच्या स्फोटांची मालिकाच घडवली.  “बनावट नोटांचं रॅकेट, बांगलादेशींना मदत, गुन्हेगारांना सरकारी पदं आणि डी कंपनीच्या गुंडाला पंतप्रधानांच्या कार्यक्रमात प्रवेश,” असे एक ना अनेक आरोप मलिकांनी केले.

 

नवाब मलिकांची आरोप मालिका

  • बनावट नोटांचा खेळ फडणवीसांच्या आशीर्वादानं!
  • नोटाबंदीनंतर फक्त महाराष्ट्रात बनावट नोटा पकडल्या गेल्या नाहीत!
  • पंतप्रधानांच्या कार्यक्रमात डी कंपनीच्या गुंडाला प्रवेश!
  • देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना गुंडांना सरकारी पदं!

 

बनावट नोटांचा खेळ फडणवीसांच्या आशीर्वादानं!

  • फडणवीस मुख्यमंत्री असताना बनावट नोटांचा खेळ सुरु होता.
  • बनावट नोटांचं पाकिस्तानपर्यंत कनेक्शन आहे. जे खोट्या नोटांचं रॅकेट चालवत होते त्याला तत्कालिन फडणवीस सरकारचा पाठिंबा होता.
  • खोट्या नोटांच्या केसेसला कमकुवत करण्याचं काम समीर वानखेडेंनेच केलं आहे.
  • खोट्या नोटाच्या केसचा इंचार्जही समीर वानखेडेच होते.
  • खोट्या नोटांच्या रॅकेटमधील इम्रान आलम शेख हा हाजी अराफत शेखचा लहान भाऊ आहे.
  • हाजी अरफात शेख याचा शिवसेनेतून भाजपामध्ये पक्ष प्रवेश घडवून फडणवीसांनी अल्पसंख्याक आयोगाचा अध्यक्ष बनवले.

 

महाराष्ट्रात बनावट नोटा पकडल्या गेल्या नाहीत!

  • देशात नोटबंदी झाली त्यावेळी खोट्या नोटा पकडले जाण्याचं प्रमाण संपूर्ण देशभरात वाढलं होतं.
  • मात्र महाराष्ट्रातून बनावट नोटांचं एकही प्रकरण समोर आलं नाही.
  • मुंबईच्या बीकेसीत ८ ऑक्टोबर २०१७ मध्ये इंटेलिजन्सकडून बीकेसीमध्ये   छापेमारी झाली, ज्यात १४ कोटी ५६ लाखांच्या खोट्या नोटा सापडल्या होत्या.
  • या प्रकरणाला फडणवीसांकडून दाबलं जाण्याकरता प्रयत्न झाले.
  • मी जे आरोप फडणवीसांवर लावतोय याबाबत मी नक्कीच गृहविभागाला माहिती देईन.

 

पंतप्रधानांच्या कार्यक्रमात डी कंपनीच्या गुंडाला प्रवेश!

  • रियाझ भाटी हा दाऊद इब्राहीमचा माणूस आहे.
  • २९ ऑक्टोबरला तो बनावट पासपोर्ट प्रकरणी रियाज भाटीला सहार विमानतळावर पकडलं गेलं होतं.
  • तो अद्यापही फरार आहे. सगळ्या शहराला माहितीय रियाज भाटी कोण आहे.
  • देशाच्या पंतप्रधानांच्या कार्यक्रमात तो कसा जातो.
  • पंतप्रधानांच्या कार्यक्रमात जो जात त्याला संपूर्ण स्कॅनिंगनंतरच पास दिला जातो.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा महाराष्ट्रात आले तेव्हा या रियाझ भाटीचे पंतप्रधानांसोबतही फोटो आहेत.
  • एखादा गुंड सहजपणे पंतप्रधानांपर्यंत पोहोचतोच कसा?
  • रियाझ भाटी हा दाऊद इब्राहीमचा माणूस आहे. तो आज फरार आहे.

 

देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना गुंडांना सरकारी पदं!

  • मुन्ना यादव, हैदर आझम, रियाझ भाटी यांच्याशी कसे संबंध आहेत ते फडणवीसांनी सांगावं.
  • केंद्रीय एजेंसींना आमचं आवाहन आहे की बनावट नोटांबाबत पुन्हा एकदा चौकशी व्हावी.
  • हत्येचा आरोप असलेल्या मुन्ना यादवला फडणवीसांनी बांधकाम कामगार मंडळावर अध्यक्ष केलं.
  • हैदर आझम बांगलादेशी लोकांना मुंबईत वसवण्याचं काम करतो, याच्या दुसऱ्या पत्नीवर बांगलादेशी असल्याच्या खोट्या कागदपत्रांबाबत गुन्हा दाखल होत असतांना फडणवीस मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री कार्यालयातून फोन गेला.

 


Tags: devendra fadanvisNawab MalikNote BandiRiyaz Bhatiदेवेंद्र फडणवीसनवाब मलिकनोटाबंदीपंतप्रधान नरेंद्र मोदीबनावट नोटांचं रॅकेटरियाझ भाटीहैदर आझम
Previous Post

लोकसहभागातून स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात यावा

Next Post

पालघरसह पेसा अंतर्गत शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेणार

Next Post
varsha gaikwad

पालघरसह पेसा अंतर्गत शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!