मुक्तपीठ टीम
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी रविवारी भाजपाशी आपलं युद्ध नसल्याचं सांगत काहीशी नरमाईची भूमिका घेतली होती. मात्र, मंगळवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मलिकांवर १९९३च्या बॉम्बस्फोटातील आरोपींशी संबंधांचा आरोप केला. त्यामुळे अपेक्षेप्रमाणेच मलिकांनी फडणविसांविरोधात गुन्हेगारी संबंधांच्या आरोपांच्या स्फोटांची मालिकाच घडवली. “बनावट नोटांचं रॅकेट, बांगलादेशींना मदत, गुन्हेगारांना सरकारी पदं आणि डी कंपनीच्या गुंडाला पंतप्रधानांच्या कार्यक्रमात प्रवेश,” असे एक ना अनेक आरोप मलिकांनी केले.
नवाब मलिकांची आरोप मालिका
- बनावट नोटांचा खेळ फडणवीसांच्या आशीर्वादानं!
- नोटाबंदीनंतर फक्त महाराष्ट्रात बनावट नोटा पकडल्या गेल्या नाहीत!
- पंतप्रधानांच्या कार्यक्रमात डी कंपनीच्या गुंडाला प्रवेश!
- देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना गुंडांना सरकारी पदं!
बनावट नोटांचा खेळ फडणवीसांच्या आशीर्वादानं!
- फडणवीस मुख्यमंत्री असताना बनावट नोटांचा खेळ सुरु होता.
- बनावट नोटांचं पाकिस्तानपर्यंत कनेक्शन आहे. जे खोट्या नोटांचं रॅकेट चालवत होते त्याला तत्कालिन फडणवीस सरकारचा पाठिंबा होता.
- खोट्या नोटांच्या केसेसला कमकुवत करण्याचं काम समीर वानखेडेंनेच केलं आहे.
- खोट्या नोटाच्या केसचा इंचार्जही समीर वानखेडेच होते.
- खोट्या नोटांच्या रॅकेटमधील इम्रान आलम शेख हा हाजी अराफत शेखचा लहान भाऊ आहे.
- हाजी अरफात शेख याचा शिवसेनेतून भाजपामध्ये पक्ष प्रवेश घडवून फडणवीसांनी अल्पसंख्याक आयोगाचा अध्यक्ष बनवले.
महाराष्ट्रात बनावट नोटा पकडल्या गेल्या नाहीत!
- देशात नोटबंदी झाली त्यावेळी खोट्या नोटा पकडले जाण्याचं प्रमाण संपूर्ण देशभरात वाढलं होतं.
- मात्र महाराष्ट्रातून बनावट नोटांचं एकही प्रकरण समोर आलं नाही.
- मुंबईच्या बीकेसीत ८ ऑक्टोबर २०१७ मध्ये इंटेलिजन्सकडून बीकेसीमध्ये छापेमारी झाली, ज्यात १४ कोटी ५६ लाखांच्या खोट्या नोटा सापडल्या होत्या.
- या प्रकरणाला फडणवीसांकडून दाबलं जाण्याकरता प्रयत्न झाले.
- मी जे आरोप फडणवीसांवर लावतोय याबाबत मी नक्कीच गृहविभागाला माहिती देईन.
पंतप्रधानांच्या कार्यक्रमात डी कंपनीच्या गुंडाला प्रवेश!
- रियाझ भाटी हा दाऊद इब्राहीमचा माणूस आहे.
- २९ ऑक्टोबरला तो बनावट पासपोर्ट प्रकरणी रियाज भाटीला सहार विमानतळावर पकडलं गेलं होतं.
- तो अद्यापही फरार आहे. सगळ्या शहराला माहितीय रियाज भाटी कोण आहे.
- देशाच्या पंतप्रधानांच्या कार्यक्रमात तो कसा जातो.
- पंतप्रधानांच्या कार्यक्रमात जो जात त्याला संपूर्ण स्कॅनिंगनंतरच पास दिला जातो.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा महाराष्ट्रात आले तेव्हा या रियाझ भाटीचे पंतप्रधानांसोबतही फोटो आहेत.
- एखादा गुंड सहजपणे पंतप्रधानांपर्यंत पोहोचतोच कसा?
- रियाझ भाटी हा दाऊद इब्राहीमचा माणूस आहे. तो आज फरार आहे.
देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना गुंडांना सरकारी पदं!
- मुन्ना यादव, हैदर आझम, रियाझ भाटी यांच्याशी कसे संबंध आहेत ते फडणवीसांनी सांगावं.
- केंद्रीय एजेंसींना आमचं आवाहन आहे की बनावट नोटांबाबत पुन्हा एकदा चौकशी व्हावी.
- हत्येचा आरोप असलेल्या मुन्ना यादवला फडणवीसांनी बांधकाम कामगार मंडळावर अध्यक्ष केलं.
- हैदर आझम बांगलादेशी लोकांना मुंबईत वसवण्याचं काम करतो, याच्या दुसऱ्या पत्नीवर बांगलादेशी असल्याच्या खोट्या कागदपत्रांबाबत गुन्हा दाखल होत असतांना फडणवीस मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री कार्यालयातून फोन गेला.