Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नौदल अधिकाऱ्याचे अपहरण करून पालघरमध्ये जिवंत जाळले

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
navy officer

गौरव पाटील

 

चेन्नई विमानतळावरून अपहरण करून आणलेल्या नौदल अधिकाऱ्याला पालघर जिल्ह्यातील जंगलात आणून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुरजकुमार मिथिलेश दुबे (वय-२७, रा. झारखंड, रांची) असे या नेव्ही अधिकाऱ्याचे नाव आहे. यास ५ फेब्रुवारी रोजी पेट्रोल टाकून जिवंत जाळले. दरम्यान होरपळलेल्या दुबेची माहिती स्थानिकांनी दिल्यानंतर घोलवड पोलिसांनी त्याला आगर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर अधिक उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात हलविल्यांनंतर तेथे शनिवारी त्याचा मृत्यू झाला आहे.

इंडियन नेव्हीत २००१ साली सिबिंग सीमॅन पदी रुजू झालेला मिथिलेश दुबे ३१ जानेवारी रोजी चेन्नई विमानतळावर पोहचला. तेथे तीन अज्ञातांनी त्याचे अपहरण केले. त्याला तीन दिवस चेन्नईला अज्ञात स्थळी कोंडून ठेऊन, त्याच्याकडे १०लक्ष रुपयांची मागणी करण्यात आली. त्याने नकार दिल्यानंतर कार मधून ५ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र-गुजरात सीमेलगतच्या तलासरी तालुक्यातील वेवजी गावच्या पश्चिम घाटातील जंगलात सकाळी नऊच्या सुमारास आणण्यात आले. त्यानंतर रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून तिघांनी त्याच्या शरीरावर पेट्रोल ओतून पेटवून दिले.

 

दरम्यान दुपारच्या सुमारास जंगलात विवस्त्र होरपळलेल्या अवस्थेतील व्यक्तीला पाहिल्यानंतर, स्थानिकांनी घोलवड पोलीस ठाण्या अंतर्गत वेवजी पोलीस चौकीला खबर दिली. पोलिसांनी तात्काळ दुबे याला डहाणूच्या आगर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.  चौकशी वेळी त्यांनी पोलिसांना जबाबात ही माहिती दिली. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्याला मुंबईत हलविण्यात आले, तेथे त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तीन अज्ञात अपहरण कर्त्यांविरुद्ध घोलवड पोलीस ठाण्यात कलम ३०७, ३६४, ३९२ आणि ३४ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.  गुन्ह्याचा अधिक तपास या ठाण्याचे प्रभारी अधिकारी कुंभार करीत आहेत.

 


Tags: Indian Navynavy officerPalgharइंडियन नेव्हीपालघर
Previous Post

‘शिवजयंती’ राष्ट्रीय सण म्हणून महाराष्ट्रात साजरी झाली पाहिजे – राजेंद्र डुबल

Next Post

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईत राष्ट्रवादी रस्त्यावर

Next Post
NCP

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईत राष्ट्रवादी रस्त्यावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!