Sunday, May 11, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

राष्ट्रीय स्टार्ट अप स्पर्धा निकाल: इन्क्यूबेटर, अॅक्सिलरेटरसह ४६ स्टार्ट अप्सच्या नावांची घोषणा

स्टार्ट अप अभियान हे आत्मनिर्भर आणि आत्म-विश्वासपूर्ण भारताचे प्रतीक : केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचे प्रतिपादन

January 17, 2022
in featured, करिअर, चांगल्या बातम्या
0
National start up competition

मुक्तपीठ टीम

“स्टार्ट अप इंडिया म्हणजे लाखो लोकांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्याचा मार्ग आहे,” असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय स्टार्ट अप पुरस्कार समारंभात बोलताना ते म्हणाले की, स्टार्ट अप अभियान हे आत्म-निर्भर आणि आत्म-विश्वासपूर्ण भारताचे प्रतीक आहे. या कार्यक्रमात, 2021 च्या राष्ट्रीय स्टार्ट अप पारितोषिक स्पर्धेचे निकाल घोषित करण्यात आले. यावेळी, एक इन्क्यूबेटर आणि एका अॅक्सिलरेटरसह एकूण 46 स्टार्ट अप्सच्या नावांची घोषणा करण्यात आली.

 

भारताला जगातील पहिल्या क्रमांकाची स्टार्टअप व्यवस्था म्हणून घडविण्यासाठी मुख्यतः पाच क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज केंद्रीय मंत्री गोयल यांनी व्यक्त केली:

  • समस्यांवरील उपाय आणि साहित्य भारतीय भाषांमध्ये विकसित करणे.
  • अधिक मोठ्या प्रमाणावर सामाजिक तसेच आर्थिक परिणाम घडविणारी उत्पादने आणि उपाय यांना प्रोत्साहन देणे.
  • देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात स्टार्ट अप्सच्या विकासाला प्रोत्साहन देणे- प्रत्येक जिल्ह्यात ‘स्टार्ट अपपर्यंत पोहोचण्याची सुविधा देणारी केंद्रे’ स्थापन करणे.
  • नागरी स्थानिक संस्थांच्या पातळीवर अभिनव संशोधन विभाग निर्माण करणे.
  • जगभरातील उत्तम प्रक्रिया आत्मसात करणे आणि भारताची वैश्विक स्पर्धात्मकता अधिक वाढविणे.

 

या सन्मान सोहोळ्यासोबतच राष्ट्रीय स्टार्टअप पारितोषिकांच्या पहिल्या आवृत्तीमधील अंतिम फेरीच्या विजेत्यांना वर्षभर देण्यात आलेले सहकार्यात्मक पाठबळ आणि २०२१ च्या राष्ट्रीय स्टार्ट अप पारितोषिकांचा संपूर्ण प्रवास याविषयीच्या माहितीवर भर देणारा ई-अहवाल देखील जारी करण्यात आला.

 

या कार्यक्रमात, २०२१ च्या राष्ट्रीय स्टार्ट अप पारितोषिक स्पर्धेचे निकाल घोषित करण्यात आले. यावेळी, एक इन्क्यूबेटर आणि एका अॅक्सिलरेटरसह एकूण ४६ स्टार्ट अप्सच्या नावांची घोषणा करण्यात आली. या स्पर्धेच्या दुसऱ्या आवृत्तीमध्ये १५ क्षेत्रे आणि ४९ उप-क्षेत्रे यांमधून अर्ज मागविण्यात आले आहेत. यामध्ये कृषी, पशुपालन,पेयजल, शिक्षण आणि कौशल्यविकास, उर्जा,उद्योग तंत्रज्ञान, पर्यावरण, आर्थिक क्षेत्रातील तंत्रज्ञान, अन्न प्रक्रिया, आरोग्य आणि स्वास्थ्य, उद्योग ४.०, अवकाश क्षेत्र तसेच वाहतूक आणि प्रवास या क्षेत्रांचा समावेश आहे. समाजाच्या कल्याणासाठी योगदान देणाऱ्या विलक्षण स्टार्टअप्सच्या कार्याला ओळख प्राप्त करून देण्यासाठी सहा विशेष श्रेणी देखील निर्माण करण्यात आल्या होत्या. भारतीय भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी नवोन्मेषी उपाय शोधणाऱ्या तसेच कोरोना महामारी विरुद्ध राष्ट्रीय पातळीवर सुरु असलेल्या उपाययोजनांना पूरक ठरणारे कार्य करणाऱ्या असामान्य स्टार्ट अप्सना देखील या पुरस्कारांच्या २०२१ च्या आवृत्तीमध्ये सन्मानित करण्यात आले.

 

अधिक माहितीसाठी कृपया खालील लिंकवर क्लिक करा :

  • राष्ट्रीय स्टार्ट अप पारितोषिक 2021 च्या विजेत्यांची यादी

National Start up Awards -2021 Winners

  • राष्ट्रीय स्टार्ट अप पारितोषिक 2021 च्या विजेत्यांच्या कार्याचे तपशीलवार सादरीकरण

National Startup Awards 2021

 

पाहा व्हिडीओ:


Tags: acceleratorcompetition resultsConsumer AffairsFood and Public Distribution and Textiles Piyush GoyalincubatorNational start up competitionstart upsStartup IndiaUnion Minister of Commerce and Industryअन्न आणि सार्वजनिक वितरण विभागअॅक्सिलरेटरइन्क्यूबेटरकेंद्रीय वाणिज्य आणि उद्योगग्राहक व्यवहारराष्ट्रीय स्टार्ट अप पारितोषिकराष्ट्रीय स्टार्ट अप स्पर्धास्टार्ट अप इंडियास्टार्ट-अप्सस्पर्धा निकाल
Previous Post

इलेक्ट्रिक गाड्यांच्या चार्जिंग स्टेशन्समध्ये व्यवसायाची मोठी संधी! मार्गदर्शक तत्वं जाहीर, परवान्याची गरज नाही!

Next Post

नवोदय विद्यालय समितीमध्ये १ हजार ९२५ जागांसाठी भरती

Next Post
Navodaya Vidyalaya Samiti

नवोदय विद्यालय समितीमध्ये १ हजार ९२५ जागांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!