मुक्तपीठ टीम
गुजरातमध्ये सुरू असलेल्या ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या चौथ्या दिवशी महिलांच्या १० हजार मीटर शर्यतीच्या अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या संजीवनी जाधवने सुवर्णपदक पटकावले, तर वेटलिफ्टिंगमध्ये अरुणाचल प्रदेशच्या साम्बो लापुंगने पुरुषांच्या ९६ किलो गटात सुवर्णपदक पटकावले. येथे अॅथलेटिक्स, तिरंदाजी, खो-खो, टेनिस, फुटबॉल, बॅडमिंटन, वेटलिफ्टिंग आणि हॉकीचे सामने होणार आहेत.
गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये राष्ट्रीय खेळ २०२२चे आयोजन करण्यात आले आहे. २९ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर दरम्यान राष्ट्रीय खेळ होणार आहेत. यामध्ये देशातील सुमारे ७ हजार खेळाडू सहभागी होणार आहेत.
या राष्ट्रीय स्पर्धेत ७ हजारपेक्षा जास्त खेळाडू , १५ हजारपेक्षा जास्त लोकांचा सहभाग, ३५ हजारापेक्षा जास्त महाविद्यालये, विद्यापीठे आणि शाळा आणि ५० लाखांहून जास्त विद्यार्थ्यांचा थेट संबंध, हे आश्चर्यकारक आणि अभूतपूर्व आहे.
गुजरातमध्ये सुरू असलेल्या ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत हरियाणाचे वर्चस्व कायम आहे. राष्ट्रीय खेळांमध्ये, हरियाणा १८ सुवर्ण पदकांसह पदकतालिकेत अव्वल स्थानावर आहे. २ ऑक्टोबर संध्याकाळपर्यंत हरियाणाला १८ सुवर्ण, १२ रौप्य आणि नऊ कांस्य पदकांसह एकूण ३९ पदके मिळाली आहेत.