मुक्तपीठ टीम
आजकाल व्हॉट्सअॅप-फेसबुक हॅक करुन पैसे मागण्याचा प्रकार वाढत आहे. अशी एक घटना नाशिकमध्ये घडली आहे. नाशिक मधील सिडको परिसरातील भाजप नगरसेवक मुकेश शहाणे यांचं फेसबुक अकाऊंट हॅक केलं करुन फेसबुक मित्रांकडे पैशाची मागणी केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी नाशिकमधील अंबड पोलीस ठाण्यात सायबर सेलकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
- भाजपाचे नगरसेवक मुकेश शहाणे हे सध्या काही कामानिमित्त बंगळूरू येथे गेले आहेत.
- या संधीचा फायदा घेत कोणीतरी त्यांचे अकाऊंट हॅक केले आणि संबंधित मित्रांकडे पैशांची मागणी केली.
- राजकीय द्वेषापोटी मला बदनाम करण्याच्या हेतूने फेसबुक अकाऊंट हॅक केल्याचा आरोप भाजप नगरसेवक मुकेश शहाणे यांनी केला आहे.
इतर अनेक बड्या लोकांचे अकाऊंट हॅक
- पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या नावे बनावट फेसबुक अकाऊंट तयार करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत.
- फेक फेसबुक अकाऊंट उघडणारा आरोपी महफुज अजीम खान याला उत्तर प्रदेशमधून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
- नुकतेच, नागपूर पोलीस आयुक्त सीपी अमितेश कुमार यांचे फेक अकाऊंट तयार करुन पैसे मागितल्याचा प्रकार घडला होता.
- सायबर गुन्हेगारांकडून वरिष्ठ दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांचेही फेक अकाऊंट केले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.