Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“नायट्रोजन डायऑक्साइड करतोय घात! दरवर्षी १८.५ लाख मुलांना दम्याचा त्रास!”

नासाने २० वर्षे गोळा केलेल्या सांख्यिकीच्या अभ्यासानंतर जारी केला अलर्ट

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
NASA Issued Alert 18.5 lakh children suffer from asthma due to Nitrogen dioxide

मुक्तपीठ टीम

बहुतांशी वाहने आणि जीवाश्म इंधनामुळे दिवसेंदिवस हवेतील नायट्रोजन डायऑक्साइड वायूचे प्रमाण वाढत आहे. यामुळे ते संपूर्ण जगासाठी मोठे आव्हान बनत चालले आहे. गेल्या २० वर्षांपासून हवेत झपाट्याने वाढलेल्या नायट्रोजन डायऑक्साइडचा फटका लहान मुलांना बसत आहे. अमेरिकन अंतराळ संस्था नासाने प्रथमच २० वर्षापर्यंत गोळा केलेल्या डेटाच्या आधारे दरवर्षी १८.५ लाख लहान मुलांना नायट्रोजन डायऑक्साइडमुळे दम्याचा त्रास होत आहे. नासाने प्रथमच उपग्रहाद्वारे गोळा केलेल्या प्रदूषणाचा डेटा आणि रोगाच्या जमिनीवरील डेटाच्या तुलनेवरून हा धक्कादायक अहवाल उघड जारी केला आहे.

या अभ्यासात २०४ देशांतील १३, हजार शहरी भागातील २० वर्षांच्या उपग्रह डेटाचे विश्लेषण करण्यात आले. वर्ष २००० ते २०१९ पर्यंत वार्षिक नायट्रोजन डायऑक्साइडचे वार्षिक उत्सर्जन, त्यांच्यातील बदल, भूप्रदूषण निरीक्षण डेटा, रोगांची आकडेवारी यांचाही विश्लेषणामध्ये समावेश करण्यात आला.

नायट्रोजन डायऑक्साइड वाढण्याचे मूळ कारण…

  • कार, ​​ट्रक, बस शहरांमध्ये सर्वाधिक नायट्रोजन डायऑक्साइड तयार करतात.
    याशिवाय डिझेलवर चालणारी उपकरणे, पॉवर प्लांट, टर्बाइन, इंजिन, औद्योगिक बॉयलर्स, सिमेंट युनिट इत्यादींमधूनही नायट्रोजन डायऑक्साइड तयार होतो.
  • हे प्रदूषण लहान मुलांमध्ये दम्याचे सर्वात मोठे कारण आहे.

मुलांना शुद्ध हवेची गरज!

  • मुलांना दमा आणि इतर श्वसनाच्या आजारांपासून वाचवण्यासाठी त्यांना शुद्ध हवा आवश्यक असल्याचे अहवालात म्हटले आहे.
  • आम्ही त्यांना ते देऊ शकत नाही.
  • जगातील ३३ टक्के शहरांमध्ये नायट्रोजन डायऑक्साइडची पातळी जागतिक आरोग्य संघटनेच्या सुरक्षिततेच्या मानकांपेक्षा जास्त आहे.

वर्ष २००० च्या तुलनेत २०१९ मध्ये शहरांमध्ये नायट्रोजनमुळे मुलांमध्ये दम्याचे प्रमाण १९ टक्क्यांवरून १६ टक्क्यांवर घसरल्याचे समोर आले आहे. जागतिक सरासरी देखील १०.३ वरून ८.५ पर्यंत घसरली. पण ही प्रोत्साहनाची बाब नाही कारण लोकसंख्या वाढल्याने प्रदूषणामुळे दम्याने ग्रस्त मुलांची संख्या कमी झाली नाही, उलट वाढली आहे. दिसलेली घसरण केवळ प्रमाणात आहे. २००० मध्ये, शहरांमधील १२.२० लाख मुलांना वायू प्रदूषणामुळे दमा झाला होता, २०१९ मध्ये ही संख्या १२.४० लाख नोंदवली गेली.


Tags: AsthmaNASANitrogen Dioxideदमानायट्रोजन डायऑक्साइडनासासांख्यिक अभ्यास
Previous Post

हिंदूंनाच नाही भोंगाग्रस्त मुसलमानांनाही राज ठाकरेंचं आवाहन!

Next Post

शिवजयंती जल्लोष कोल्हापूरचा!

Next Post
शिवजयंती जल्लोष कोल्हापूरचा!

शिवजयंती जल्लोष कोल्हापूरचा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!