कृष्णा पंचगंगेच्या नयनरम्य तीरावरील दत्ताची राजधानी…नरसोबाची वाडी!
नरसोबाची वाडी. श्री दत्तात्रयांचं पवित्र स्थान. तिथं गेलं की मनात भक्तिभावाला उधाण येतं. शेजारून वाहणाऱ्या कृष्णा पंचगंगेसारखीच मनात भक्ती ओसंडते. मनातील भक्तिभाव मुखातील दत्तनामातून अखंड प्रवाही होतो.