मुक्तपीठ टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण भारताच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या कार्यक्रमांमध्ये सर्वात महत्वाचा होता, लष्कराला अर्जुन रणगाडे सोपवण्याचा कार्यक्रम. त्यांनी तमिळनाडूताल कार्यक्रमात भारतात बनवले गेलेले अत्याधुनिक ११८ अर्जुन रणगाडे लष्कराला सोपवले. तब्बल ८४०० कोटी रुपयांच्या या रणगाड्याची निर्मिती डीआरडीओने केली आहे.
चेन्नईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११८ हायटेक अर्जुन रणगाडे (MK-1A) सैन्याकडे सोपवले आहेत. यावेळी लष्कर प्रमुख एमएम नरवणे उपस्थित होते. या रणगाड्यांना डीआरडीओने ८४०० कोटींमध्ये तयार केले आहे.
१४ फेब्रुवारी पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा दुसरा स्मृति दिन. पंतप्रधान मोदींनी पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले की, “आजचा दिवस कोणताही भारतीय विसरू शकत नाही. दोन वर्षांपू्र्वी आजच्या दिवशी पुलवामात हल्ला झाला होता. आम्ही त्या सर्व शहिदांना श्रद्धांजली देतो, ज्यांनी त्या हल्ल्या आपले प्राण गमावले. आम्हाला आमच्या सुरक्षा दलांचा अभिमान आहे. त्यांचे धैर्य पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील. आज मी देशामध्ये तयार आणि डिझाइन केलेले अर्जुन मेन बॅटल रणगाडे देशाला सोपवले आहे.”
अर्जुन रणगाड्यांविषयी सर्वकाही…
• अर्जुन रणगाड्यावर १२० मिलीमीटर व्यासाची मुख्य तोफ आहे.
• ७.६६ मिमी व १२.७ मिमीच्या दोन मशीनगन्स आहेत.
• अर्जुनचे डिझेल इंजिन १४०० अश्वशक्तीचे आहे.
• अर्जुन सपाट जमिनीवरून ताशी ६७ किलोमीटरच्या तर ओबडधोबड जमिनीवरून ४० किमी प्रति तास वेगाने प्रवास करू शकतो.
• तो चालवण्यासाठी कमांडर, गनर, लोडर आणि ड्रायव्हर अशा चार जणांची टीम असते.
• ‘अर्जुन’साठी ‘कांचन’ नावाचे मोडय़ुलर कॉम्पोझिट प्रकारचे चिलखती आवरण विकसित करण्यात आले आहे.
• अर्जुनची मार्क-१, मार्क-२ आणि ‘टँक-एक्स’ अशी मॉडेल्स आहेत.
• भारतीय लष्कराला १४ फेब्रुवारीला मार्क-२ प्रकारच्या ११८ रणगाडे सोपवले गेले आहेत.
पाहा व्हिडीओ: