मुक्तपीठ टीम
“सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत झालेला विजय हा भाजपाचा विजय आहे. आमदार नितेश राणेंनी घेतलेल्या परिश्रमाचा विजय आहे,” अशी विजयानंतरची पहिली प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्गात पोहचल्याबरोबर दिली आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा बँक जिंकल्यानंतर आता आपलं पुढचं लक्ष्य महाराष्ट्रातील सत्ता असल्याची घोषणाही त्यांनी केली.
विजयानंतर राणे नव्या उत्साहात!
आता बारामतीला येथून कर्ज जाणार नाही!
- गड आला सिंह गेला असे नाही. राजन तेलींचा पराभव झाला असला तरी गल्ली ते दिल्ली भाजपाची सत्ता आहे. त्यांची वर्णी लावणार.
- जिल्हा बँकेसाठी तीन पक्ष एकत्र आले.
- निवडणुकीसाठी अर्थमंत्री येतात, पराभव करुन जातात!
- तीन पक्षाचे मोठे नेते येतात. तरीही त्या तीन पक्षांचा पराभव होतो, त्याला म्हणतात अक्कल!
- बारामतीला कारखाना घेण्यासाठी आता येथून कर्ज दिले जाणार नाही.
- ३६ मते मिळत नाहीत आणि आमदारकीची स्वप्न पाहतात!
आता लक्ष महाराष्ट्रातील सत्तेवर!
- आजवर सगळ्यांना पुरुन उरलो, दिल्लीपर्यंत पोहचलो!
- महाआघाडीची लायकी पोस्टरबाजीची, राज्य करण्याची!
- महाराष्ट्राला सध्या मुख्यमंत्री नाही.
- महाराष्ट्र हे देशातील विकसित राज्य, ते अधोगतीला चालले आहे.
- महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेला चांगले दिवस यावेत यासाठी काम करणार.
- महाराष्ट्रात भाजपाची सत्ता आणणार!