मुक्तपीठ टीम
वरिष्ठ पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांच्या स्फोटक पत्रानंतर आता भाजपाचे खासदार नारायण राणे आपल्या शत्रू नंबर १ असणाऱ्या शिवसेनेला लक्ष्य करणं टाळतील हे शक्यच नव्हते. इतर भाजपा नेते राष्ट्रवादी काँग्रेसला जास्त लक्ष्य करत असतानाच नारायण राणे यांनी मात्र थेट मुख्यमंत्री ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांनीच राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी केली आहे.
नारायण राणे यांचा मुख्यमंत्री ठाकरेंवर हल्लाबोल
- पहिले मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा
- राज्यात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही, पैसा द्या आणि विकत मिळते. हे
- राज्यजनतेचं राज्य नाही, जो पैसे देईल त्याचं राज्य, पैसे द्या आणि कोणाचाही मुडदा पाडा, असं राज्य चाललं आहे.
- वाझेंना मुख्यमंत्र्यांनी पुन्हा पोलीस दलात आणले होते
- सचिन वाझे मुख्यमंत्र्यांसाठी काम करायचा.
- सचिन वाझेला पोलीस खात्यात रुजू कोणी केलं.
- वाझेला सर्व जबाबदारी देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांचे.
- परबीर सिंहाचा आरोप हा मुख्यमंत्र्यांवरही आहेत.
- गेले अनेक दिवस वाझे वर्षावर, ऑबेरॉयमध्ये राहायचा, हे मुख्यमंत्र्यांना माहिती नव्हतं का?
- मुख्यमंत्र्यांनी कारवाई का केली नाही?
- परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना आधीच कळवलं होतं.
- त्यांनी वसूलीची माहिती उद्धव ठाकरेंना दिली होती.