मुक्तपीठ टीम
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची ईडी कोठडी आणि त्यांचा राजीनाम्यासंबंधित पत्रकार परिषद घेत भाजपावर टीका केली होती. यावेळी पवार यांनी नारायण राणेंना देखील अटक झाली होती, त्यावेळी त्यांचा राजीनामा का घेतला नाही? तसेच नारायण राणे आणि नवाब मलिकांनी वेगळा न्याय का? असा सवाल पवारांनी भाजपला केला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी पवारांना प्रयुत्तर दिलं आहे.
आमचा कोणी दाऊद दोस्त नाही, राणेंचं पवारांना प्रत्युतर
- दिशा सालियन मृत्यू प्रकरणासंबंधित मालवणी पोलीस स्टेशनमधून नऊ तासांच्या चौकशीनंतर बाहेर आल्यावर नारायण राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
- ते म्हणाले की, “शरद पवार यांचे मी काही विधान ऐकले, ते म्हणाले नारायण राणेंनाही अटक झाली होती. त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा का घेत नाही.
- वा… पवार साहेब, काय बोलावं का कीव करावी या वाक्यावरून आपली मला कळत नाही.
- आमचा कोणी दाऊद दोस्त नाही आमचा कधी संबंध आला नाही.
- तो देशद्रोही आहे, आमचे हजारो लोक बॉम्बस्फोटात मारले आहेत.
- त्या दाऊशी नवाब मलिकांचे संबंध आहेत म्हणून त्यांना अटक झाली, म्हणून आम्ही राजीनाम्याची मागणी करत आहोत.
- तुम्ही आमचे राजीनामे मागताय, मागा ना कोणी नाही म्हटलं, हेच तर केलं आयुष्यभर हीच तर तुमची पुण्याई आहे.
- म्हणून आम्ही या देशाचे नागरिक असून, या देशाचे प्रतिनिधी आहोत, आम्ही इथे होणाऱ्या अन्याविरोधात आवाज उठवणार म्हणून आमचा आवाज कोणी दाबू शकणार नाही.
काय म्हणाले होते शरद पवार?
- राणे साहेब त्यांनाही अटक केल्याचं वाचलं होते मी.
- त्यांना अटक केल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळातून कमी करण्याचा निर्णय घेतला असं काही माझ्या पाहण्यात आलं नाही.
- उद्या पंतप्रधान पुण्यात येतील तेव्हा ते कदाचित याचा गौप्यस्फोट करतील.
- एक न्याय तुम्ही नारायण राणेंना लावता अन् दुसरा न्याय नवाब मलिकांना लावता याचा अर्थ हा सर्व राजकीय उद्देशाने सुरू केलेला उद्योग आहे.