Tuesday, June 3, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुख्यमंत्रीपदावरून राणेंचा वेगळाच ‘प्रहार’, ठाकरेंनी सांगितल्यामुळे पवारांनी सुचवले नाव!

October 21, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
narayan rane

मुक्तपीठ टीम

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणाची आता केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी दखल घेतली आहे. नारायण राणे यांनी त्यांच्या प्रहार या दैनिकामधून हार आणि प्रहार या स्तंभात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसे झाले? ‘त्या’ संदर्भात नेमकं काय घडलं? याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रहारमधून वेगळीच माहिती दिली आहे.

 

ठाकरेंनी सांगितले, पवारांनी केले!

  • शिवसेना आता वाघ राहिलेली नाही
  • हे म्हणतात, मला शरद पवार यांनी मुख्यमंत्री केले.
  • आम्हाला माहिती आहे, कसे केले ते!
  • शिवसैनिक साक्षीदार आहेत.
  • संजय राऊत जी, मुख्यमंत्रीपदाचा निर्णय होण्याच्या आदल्या रात्री आपण उद्धव ठाकरे व आदित्यना घेऊन शरद पवार साहेबांच्या घरी पोहोचलात.
  • त्यावेळी तुमच्यासोबत एकनाथ शिंदे किंवा अन्य कोणी शिवसैनिक नव्हता.
  • आपण तिघे शरद पवार यांना भेटल्यानंतर त्यांना विनंती केली की, साहेब, आम्हाला शिवसैनिकाला मुख्यमंत्री करावयाचे होते, पण काही कारणामुळे ते शक्य नाही.
  • आता मलाच मुख्यमंत्री करा, अशी विनंती करायला आलो आहे.
  • याला राऊत साहेबांनी दुजोरा दिला.
  • त्यानंतर शरद पवार साहेब म्हणाले, वा! हे उत्तमच झाले!
  • मी उद्याच्या बैठकीत हे जाहीर करतो.
  • त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशीच्या बैठकीमध्ये शरद पवार साहेबांनी आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचे नाव जाहीर केले.
  • त्यामुळे आपण मांजरीप्रमाणे डोळे मिटून दूध पिण्याचे सोडा.
  • तिची मांजर, शेळी झाली आहे.

 

बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाला तिलांजली!

  • ‘मराठी माणसाची आणि हिंदूंची एकजूट करा! हिंदू तितुका मेळवावा!! हिंदुस्थान धर्म वाढवावा!!!’ किती हा बोगसपणा? किती हा खोटारडेपणा?? किती ही बनवाबनवी??? महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद हडपण्यासाठी तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाला तिलांजली दिली.
  • आता तुमच्याकडे ना हिंदुत्व, ना धर्म! तुमच्याकडे आहे ते फक्त सत्तेच्या लालसेपोटी हिंदुत्वाशी गद्दारी करून मिळविलेले मुख्यमंत्री पद!! याच ‘सामना’मध्ये उल्लेख आहे की, ‘अमली पदार्थांचा नायनाट केलाच पाहिजे.
  • पण सत्तेचं व्यसन हा सुद्धा एक अमली प्रकारच आहे.’
  • कोण करणार नायनाट? सत्तेचा जनहितासाठी वापर कधी करणार? घ्या की अंगावर, करा की नायनाट! संजय राऊत बरोबर बोलतात.
  • सत्तेचं व्यसन हा सुद्धा अमली पदार्थांचाच प्रकार.
  • सत्तेचे व्यसन लागल्यामुळेच हिंदुत्वाचा त्याग आणि सत्तेचा हव्यास!!

 

हिंमत असेल तर शिंगावर घ्या !

  • हिंमत असेल तर शिंगावर घ्या दिवस आणि वेळ कळवा.
  • साहेब असताना पुत्रकर्तव्याला जागले नाहीत ते आता पुत्रकर्तव्याला कसे जागणार?
  • नवीन आलेल्या घाबरट आणि पुळचट लोकांमुळे शिवसेना वाढली नाही.
  • कुणाच्या गालाला पाच बोटे देखील न लावणारे हिम्मत असेल तर अंगावर या म्हणणात यापेक्षा मोठा विनोद कोणता?
  • सत्तेसाठी हिंदुत्वशी गद्दारी करणारे उद्धव ठाकरे १९२५ मध्ये स्थापन झालेल्या RSS ला हिंदुत्व शिकवायला निघाले आहेत.

Tags: balasahebh thackreychief minister uddhav thackerayEknath ShindeNarayan ranesanjay rautsharad pawarएकनाथ शिंदेबाळासाहेब ठाकरेशरद पवारसंजय राऊत
Previous Post

नाशिकचं साहित्य संमेलन डिसेंबरमध्ये, पण आता स्थळ बदलल्यानं वाद!

Next Post

लसीकरण शंभर कोटीपार! पण मास्कमुक्ती कधी?

Next Post
mask free

लसीकरण शंभर कोटीपार! पण मास्कमुक्ती कधी?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!