मुक्तपीठ टीम
भाजपा नेते चंद्रकांत पाटलांनंतर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्यात मार्चमध्ये भाजपाचे सरकार येणार असं भाकित केलं आहे. यावेळी राणेंनी सरकार बदलाची भविष्यवाणी केली ते स्थान आहे राजस्थानची राजधानी जयपूरचे. तिथं दौऱ्यादरम्यान नारायण राणे यांनी हे विधान केले आहे. राणे यांनी याआधीही सत्तापालटाची भाकितं केली आहेत. मात्र, यावेळी महाराष्ट्रातील मोठे नेते दिल्लीत असताना हे विधान आल्यामुळे नव्यानं चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, याविषयी राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आले असता त्यांनी “मी नारायण राणेंचे ते वक्तव्य ऐकलेलं नाही.’ असे सांगितले.
मार्चमध्ये राज्यात भाजपाचे सरकार
- नारायण राणे यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला आहे.
- राज्यात अनागोंदी कारभार आहे.
- भाजपाचं सरकार नाही त्यामुळे असं होत आहे.
- मार्च महिन्यात राज्यात भाजप सरकार येणार.
- तेव्हा तुम्हाला अपेक्षित बदल दिसेल.
- राज्यातील मविआ सरकार फार काळ टिकणार नाही.
सरकारचं लाईफ अधिक नाही
- माझ्या मनात काही गोष्टी आहेत.
- त्या आताच सांगणार नाही.
- सरकार पाडायचं असेल किंवा नवं सरकार आणण्यासाठीच्या काही करायचं असेल तर अशा गोष्टी उघड बोलायच्या नसतात.
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आजारी आहेत.
- आजारी माणसाचं नाव घेऊन काही बोलणं योग्य नाही.
- पण आघाडी सरकारचं लाईफ अधिक नाही, असंही ते म्हणाले.
राणे यांची याआधीही भविष्यवाणी
- नारायण राणे यांनी भाजपामध्ये आल्यापासून सरकार कोसळणार असल्याच्या भविष्यवाणी अनेकदा केल्या आहेत.
- कधी दिवाळीनंतर सरकार कोसळेल, तर कधी नव्या वर्षात सरकार कोसळेल असं त्यांनी सांगितलं आहे.
- मात्र, राणेंनी दिलेल्या डेडलाईनमध्ये सरकार काही कोसळलेलं नाही.