मुक्तपीठ टीम
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानाखाली लगावण्यासंबंधी केलेल्या वक्तव्यानंतर वाद चांगलाच चिघळला आहे. शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. राणेंविरोधात नाशिक, पुणे आणि महाडमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी स्वत: नारायण राणेंनी चिपळूणमध्ये माध्यमांशी बोलताना आक्रमक प्रत्युत्तर दिले आहे.
मी कोणताही गुन्हा केलेला नाही
- “माहितीच्या आधारे मी उत्तर देणार नाही.
- गुन्हा दाखल झाल्याची माझ्याकडे माहिती नाही. मी कोणताही गुन्हा केलेला नाही, तुम्ही तपासून पाहा.
- नाहीतर टीव्ही चॅनेल्सविरोधात मी गुन्हा दाखल करणार.
- गुन्हा नसताना पथक निघालं, अटक होणार सांगितलं जात आहे.
मी काय साधा माणूस वाटलो काय?
- मी काय साधा माणूस वाटलो का?
- माझी बदनामी केली तर तुमच्याविरोधात गुन्हा दाखल करेन.
- आम्ही समर्थ आहोत.
- दोन दगड मारुन गेले असतील तर त्यात पुरुषार्थ नाही.
- ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी थोबाड फोडण्याचं वक्तव्य केलं होतं तेव्हा तो गुन्हा नव्हता का?
- मग त्यावेळी गुन्हा दाखल का झाला नाही?
- देशाचा अमृतमहोत्सव माहिती नसणं हा देशाचा अपमान, राष्ट्रद्रोह आहे अशी टीका करताना नारायण राणे यांनी मी असतो तर…ऐवजी आत्ता कानफाड फोडेन असं म्हणालो असतो तर तो गुन्हा ठरला असता.
- मी या देशाचा केंद्रीय मंत्री आहे.
- काय चेष्टा लावली आहे.
“मी शिवसैनिकांना भीक घालत नाही
- “मी अशा शिवसैनिकांना भीक घालत नाही. कोण आहेत ते…समोर उभं तरी राहावं”.
- “पोलिसांनी पत्र दिलं नसून नोटीस दिली आहे, त्यात फरक आहे.
- आदेश काढायला तो काय राष्ट्रपती आहे की पंतप्रधान आहे?
- मी जे बोललो तो गुन्हा नाही..तपासून पाहावं.
मी जी शिवसेना सोडली ती शिवसेना गेली
- “पोलिसांची तत्परता आदेशामुळे आहे.
- आमचं पण सरकार वरती आहे.
- हे कुठपर्यंत उडी मारतात पाहूयात”.
- जन आशीर्वाद यात्रा वेळापत्रकाप्रमाणे जाणार असल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलं.
- तसंच मी शिवसेनेच्या आक्रमकतेला जुमानत नाही.
- आम्ही डबल आक्रमक आहोत.
- नारायण राणेंनी जी शिवसेना सोडली ती शिवसेना गेली.
- मी आता रस्त्याने जाणार आहे, काय होतंय पाहूया असं आवाहन यावेळी त्यांनी दिलं.