Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“पेट्रोल-डिझेलची जुलमी दरवाढ मागे घ्या अन्यथा भविष्यात मोठे आंदोलन करु!”: नाना पटोले

June 7, 2021
in घडलं-बिघडलं
0
nana patole

मुक्तपीठ टीम

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार पेट्रोल डिझेलवर भरमसाठ कर लादून जनतेचे खिसे कापत आहे. या अन्यायी जुलमी, अत्याचारी दरवाढीविरोधात काँग्रेस पक्षाने रस्त्यावर उतरून आज राज्यभर आंदोलनाच्या माध्यमातून विरोध केला आहे. मोदी सरकारने ही जुलमी करवसुली कमी करून जनतेला दिलासा द्यावा अन्यथा भविष्यात काँग्रेस पक्ष यापेक्षा तीव्र आंदोलन करेल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.

 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथील पेट्रोल पंपावर इंधन आणि गॅस दरवाढी विरोधातील आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, आ. अभिजीत वंजारी, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश सचिव रविंद्र दरेकर, राजा तिडके, जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी आदी उपस्थित होते.

 

वडसा येथे प्रसारमाध्यमाशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, कोरोनाने दीड वर्षापासून लोकांचे उत्पन्न कमी झाले आहे, उद्योग धंदे बंद आहेत, लाखो लोकांचे रोजगार गेले, कठीण परिस्थितीत लोक जगत असताना त्यात इंधन दरवाढ व महागाईने लोकांचे जगणे मुश्कील झाले आहे. युपीए सरकारच्या काळात डॉ. मनमोहनसिंह यांनी इंधनाच्या महागाईची झळ लोकांना बसू नये म्हणून दर स्थिर ठेवून जनतेला दिलासा होता परंतु मोदी सरकार मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेलाचे भाव कमी असतानाही भरमसाठ कररुपाने लोकांच्या खिशावर दरोडे टाकून नफेखोरी करत आहे.

 

राज्यव्यापी आंदोलनात ठाणे येथे प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले, यावेळी जिल्हाध्यक्ष मनोज शिंदे, विक्रांत शिंदे, रविंद्र आंग्रे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. कोल्हापुरात गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. पुण्यातील सर्व विधानसभा मतदार संघांमधील ३५ पेट्रोल पंपासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. कसबा विधानसभा मतदारसंघातील कुलकर्णी पेट्रोल पंपासमोर प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. चंद्रपुरात खासदार बाळू धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. नाशिक, सांगली, अहमदनगर, नांदेड, मालवण, अमरावती, सावंतवाडी, कणकवली, बुलढाणा, नांदेड, औरंगाबाद यासह विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले.

 

राज्यातील एक हजार पेट्रोल पंपांवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकाचवेळी आंदोलन करुन इंधन दरवाढीचा तीव्र निषेध केला. यावेळी मोदी सरकार जुलमी दरवाढीविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

 

 

 


Tags: CongressMinister Vijay wadettiwarnana patoleprime minister narendra modisatej patilपंतप्रधान नरेंद्र मोदीपेट्रोल आणि डिझेलसतेज पाटील
Previous Post

पंतप्रधान मोदी – मुख्यमंत्री ठाकरे भेटीत मराठा आरक्षणावर तोडगा निघणार?

Next Post

“आधी तुम्ही पेट्रोल डिझेलवरील कर कमी करा, मग केंद्राकडे मागणी करा”

Next Post
Chandrakant Patil

"आधी तुम्ही पेट्रोल डिझेलवरील कर कमी करा, मग केंद्राकडे मागणी करा"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!