मुक्तपीठ टीम
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या पदभार आज नाना पटोले यांनी स्वीकारला. पदभार स्वीकरल्यानंचर मरिन ड्राइव्ह ते ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत रॅली काढण्यात. या रॅलीत नाना पटोले यांनी ट्रॅक्टर चालवत शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. तसेच काँग्रेसच यापुढे सत्तेत राहणार असा विश्वास व्यक्त केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टिकास्त्र सोडले.
“नरेंद्र मोदींनी देशाच्या शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. राज्यसभेत आंदोलनावर टीका केली, त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे पाप केले. या माध्यमातून आम्ही देशाच्या अन्नदात्याचा अपमान करेल त्याच्याविरोधात याच पद्धतीची व्यवस्था निर्माण केली जाईल असा संदेश देत आहोत,” असे नाना पटोले यांनी म्हटले.
Handed over the charge of @INCMaharashtra presidentship to the newly appointed president @NANA_PATOLE in the presence of Maharashtra in-charge @HKPatil1953 ji in Tilak Bhavan. Best wishes to the new team & I am confident that they will work hard & strengthen the party.@INCIndia pic.twitter.com/6T66HFdM70
— Balasaheb Thorat (@bb_thorat) February 12, 2021
तसेच इंधन दरवाढीबद्दल पटोले म्हटले की, “आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी असतानादेखील १०० रुपयांपर्यंत दर गेले आहेत. देशातील जनतेची लूट सुरु आहे. त्यामुळे महागाईविरोधातही आम्हाला संदेश द्यायचा आहे”.
प्रदेश प्रभारी श्री एच. के. पाटील जी. व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष श्री बाळासाहेब थोरात व अन्य नेतागण व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष पदाचे मुंबई येथील टिळक भवन कार्यालयात पदभार स्वीकारला. pic.twitter.com/gjZiV57ZIN
— Nana Patole (@NANA_PATOLE) February 12, 2021
देशातील हुकूमशाही मोदी सरकारविरोधात चले जावची घोषणा आम्ही देणार आहोत. तर काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रातील नंबर एकचा पक्ष झाल्याशिवाय राहणार नाही. यापुढे काँग्रेसचीच महाराष्ट्रात सत्ता राहणार असा विश्वासही बोलून दाखवला.