Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“काँग्रेस पक्ष माथाडी कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल!”: नाना पटोले

प्रदेशाध्यक्ष पटोलेंच्या उपस्थितीत माथाडी कामगारांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

July 8, 2021
in घडलं-बिघडलं
0
nana patole

मुक्तपीठ टीम

केंद्रातील मोदी सरकारने नवीन कायदे करून शेतकरी, कष्टकरी, कामगारांना देशोधडीला लावण्याचे पाप केले असून कामगारांना भांडलदारांच्या दावणीला बांधण्याचे काम केले आहे. कामगार हा महत्वाचा घटक असून त्यांचा सन्मान झालाच पाहिजे. काँग्रेस पक्ष नेहमीच कष्टकरी, कामगार वर्गाच्या न्याय हक्कासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे आणि भविष्यातही कामगारांच्या हितासाठी उभा राहिल अशी ग्वाही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

 

टिळक भवन येथे आज माथाडी कामगार नेते राजन म्हात्रे, छगन पाटील यांच्या नेतृत्वात असंख्य माथाडी कामगारांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या कार्यक्रमाला प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, उपाध्यक्ष हुसेन दलवाई, उपाध्यक्ष भाई नगराळे, किसान काँग्रेसचे शाम पांडे, बद्रुद्दीन जमा, आदी उपस्थित होते.

nana patole

यावेळी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, कामगार, शेतकरी ही देशाची खरी ताकद आहे हे पंडित नेहरुंनी ओळखले होते. त्यांच्या ताकदीवरच स्वातंत्र्यानंतर देशाला एक सक्षम, बलशाली राष्ट्र म्हणून उभे केले. कामगारांच्या हक्कासाठी काँग्रेस पक्षाने अनेक कायदे केले आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले. परंतु केंद्रातील भाजपा सरकारने या कामगारांच्या अस्तित्वावरच घाला घातला आहे. काँग्रेस पक्ष माथाडी कामगारांच्या अधिकारांसाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल, त्यांना न्याय देईल, आपले प्रश्न सरकार दरबारी मांडून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेन असा विश्वास पटोले यांनी यावेळी दिला आणि काँग्रेस प्रणित माथाडी कामगार संघटना सर्वात मोठी संघटना करा असे आवाहन केले.

 

टिळक भवन येथील कार्यक्रमात लोकनेते नानाभाऊ पटोले सोशल फोरम काँग्रेस पक्षात समाविष्ठ करण्यात आला. कष्टकरी शेतकरी संघटना, श्रमीक मुक्ती आंदोलन व महाराष्ट्र आदिवासी मंचच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तर भाजपाच्या भटक्या विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रोहिदास दत्तु चव्हाण शिवसेना प्रणित न्यू हिंदुस्थान कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

 


Tags: Congressnana patoleकाँग्रेसनाना पटोलेश्रमीक मुक्ती आंदोलन
Previous Post

“चित्रपट सृष्टीतील गुन्हेगारी व दहशत मोडून काढण्यासाठी कठोर कारवाई”

Next Post

मोदी सरकारमध्ये महाराष्ट्रातील मंत्र्यांना नेमकं किती महत्व?

Next Post
modi cabinet

मोदी सरकारमध्ये महाराष्ट्रातील मंत्र्यांना नेमकं किती महत्व?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!