Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

२५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या पण शेतकऱ्यांसाठी दमडी नाही! : नाना पटोले

August 24, 2022
in घडलं-बिघडलं
0
Nana Patole EKnath Shinde And Devendra Fadnavis

मुक्तपीठ टीम

राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज आहे परंतु एकनाथ शिंदे- फडणवीस सरकार मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे. शेतकऱ्यांसाठी केवळ मदत जाहीर केली तीसुद्धा तुटपुंजी आहे. २५ हजार कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या सादर करण्यास आल्या पण त्यात शेतकऱ्यांसाठी दमडीची तरदूत केली नाही हे अत्यंत दुर्दैवी या सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

विधीमंडळ परिसरात प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, अतिवृष्टीने गावे उद्ध्वस्थ झाली आहेत. शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले, जनावरे वाहून गेली आहेत. अशी परिस्थितीत ओला दुष्का जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची गरज आहे पण राज्य सरकारला शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे वाटत नाहीत. विरोधी पक्ष नात्याने आम्ही सातत्याने शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत आहोत पण सरकार शेतकरी प्रश्नावर बोलण्यास तयार नाही. पुरवणी मागण्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी एक रुपयाचेही प्रावधान नाही. उस्मानाबाद जिल्ह्यातील एका शेतकऱ्यांने आज मंत्रालयासमोर पेटवून घेण्याचा प्रयत्न केला तर वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्याने काल आत्महत्या करून आयुष्य संपवले. शेतकऱ्याला मंत्रालयलाच्या सहाव्या मजल्यावर मारहाण करण्यात आली, शेतकरी दररोज आत्महत्या करीत आहे पण राज्यातील सरकार आपल्याच मस्तीत वागत आहे. शेतकऱ्यांना हे सरकार आपले वाटत नाही ही भावना वाढत चालली आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजार रुपये कोरवाहूसाठी तर बागायती तसेच फळबागासाठी हेक्टरी १.५ लाख रुपये दिले पाहिजेत या मागणीवर आम्ही ठाम आहोत.

रायगडच्या समुद्रात शस्त्रात असलेली एक बेवारस बोट सापडली तर ट्रॅफिक हवालदाराच्या व्हॉट्सऍपवर मुंबईवर हल्ला करणारा मेसेज येतो हे गंभीर आहे. मुंबई शहर हे संवेदनशील शहर आहे, पण हे प्रकार समोर आल्याने मुंबईच्या सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत, राज्य सरकारने या प्रमुख विषयांवर लक्ष देण्याची गरज आहे असेही पटोले म्हणाले.


Tags: @INCMaharashtrafarmersMaharashtranana patoleShinde - Fadnavis Governmentनाना पटोलेशिंदे-फडणवीस सरकारशेतकरी
Previous Post

पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत उपाययोजना करणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण

Next Post

‘भारत पेट्रोलियम’च्या संचालक (विपणन) या पदाची सूत्रे सुखमल जैन यांनी स्वीकारली

Next Post
Sukhmal Jain

‘भारत पेट्रोलियम’च्या संचालक (विपणन) या पदाची सूत्रे सुखमल जैन यांनी स्वीकारली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!