Monday, March 9, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“देशाला कोरोनाच्या खाईत ढकलून निवडणुका जिंकायला निघालेल्या भाजपला जनतेने धडा शिकवला”: नाना पटोले

May 2, 2021
in घडलं-बिघडलं
0
nana patole

मुक्तपीठ टीम

 

एका महिलेला पराभूत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांचे संपूर्ण मंत्रिमंडळ, देशभरातील भाजपचे नेते आणि केंद्र सरकारच्या सर्व संस्था देशातील जनतेला वा-यावर सोडून पश्चिम बंगालमध्ये प्रचार करत होते. सत्ता, पैसा, केंद्रीय संस्थांचा प्रचंड गैरवापर करूनही बंगालच्या जनतेने भाजपला पराभूत करून बंगाली समाज आणि संस्कृतीवर आक्रमण करू पाहणाऱ्या हुकुमशाही प्रवृत्तीला त्यांची जागा दाखवून दिली आहे. पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडूतील भाजपच्या पराभवाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला कोरोना संकट हाताळण्यात आलेल्या अपयशावर शिक्कामोर्तब केले आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

पाच राज्यांच्या निवडणूक निकालावर प्रतिक्रिया व्यक्त करताना नाना पटोले म्हणाले की, कोरोनाच्या महाभयंकर संकटकाळात बेड्स, ऑक्सिजन, औषधे, रेमडेसिवर इंजेक्शन याच्या तुटवड्यामुळे देशात दररोज हजारो लोक मृत्यूमुखी पडत आहेत. अशा परिस्थितीतही देशाचे पंतप्रधान मरणाऱ्या लोकांना वाचविण्याऐवजी पश्चिम बंगालमध्ये एका महिलेला हरवून सत्ता मिळविण्यासाठी प्रचार करत होते. देशाच्या इतिहासात असे चित्र कधी दिसले नव्हते. या निवडणूकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा असंवेदनशील, क्रूर आणि भेसूर चेहरा देशासोबतच जगाने पाहिला. जगभरातील माध्यमांनी त्यांच्या या असंवेदनशील आणि बेफिकीरपणाची चिरफाड केली. आजच्या निकालातून पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडूच्या जनतेने निवडणुका जिंकून सत्ता मिळवण्यासाठी अत्यंत खालच्या पातळीवर गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला सणसणीत चपराक लगावली आहे.

भारतीय जनता पक्षाने आपल्या नेहमीच्या कार्यपद्धतीने धार्मिक तणाव निर्माण करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न या निवडणुकीतही केला. केंद्र सरकारच्या अख्त्यारितील विविध संस्थांचा सायासाठी पुरेपूर गैरवापर केला पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. कोरोनाचे नियम पायदळी तुडवत सत्तेसाठी कोट्यवधी लोकांचे आरोग्य धोक्याच टाकणाऱ्या केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि निवडणूक आयोग या दोघांवरही न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. बंगाल, केरळ, तामिळनाडूच्या सूज्ञ जनतेने दिलेला कौल आपल्या बेजबाबदार केंद्र सरकारला व आपली स्वायत्ता गहाण ठेवून केंद्रातील सत्ताधाऱ्यांना शरण गेलेल्या सर्वांसाठी धडा आहे.

या निवडणुकांचे निकाल काँग्रेस पक्षासाठी फारसे उत्साहवर्धक नाहीत. पण आमच्या नेत्या आदरणीय सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी निवडणुकीतील विजयापेक्षा जनतेच्या आरोग्याला प्रथमिकता देत प्रचार आवरता घेतला होता. जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य असून काँग्रेस पक्ष निकालावर मंथन करेल. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत स्थानिक मुद्दे आणि विठ्ठल कारखान्यांच्या थकित बिलांचा मुद्दा प्रभावी ठरल्याने महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. जनमताचा कौल आम्ही विनम्रपणे स्वीकारतो, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.


Tags: BJPCongressMamata Banerjeenana patolprime minister narendra modirahul gandhiSonia Gandhiनाना पटोलेपंतप्रधान नरेंद्र मोदी
Previous Post

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत ६४ जागांसाठी भरती

Next Post

“राज्यातील ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर पुरवठयाचे योग्य नियोजन सुरू” – डॉ. राजेंद्र शिंगणे

Next Post
rajendra shingane

"राज्यातील ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर पुरवठयाचे योग्य नियोजन सुरू" - डॉ. राजेंद्र शिंगणे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!