Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘युसूफ खान’चे ‘दिलीप कुमार’…’वासुदेव’ होता होता राहिले…कसे?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
dilip kumar

मुक्तपीठ टीम

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं वयाच्या ९८ वर्षी निधन झाले. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेते दिलीपकुमार हिंदी सिनेमासृष्टीतील पहिले सुपरस्टार. ट्रॅजडी किंग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिलीप कुमारांनी सुमारे सहा दशकं त्यांनी आपल्या अभिनयाद्वारे चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवलं आहे.

 

दिलीप कुमार यांनी ६३ चित्रपटात काम केलं. सध्या पाकिस्तानात असलेल्या पेशावरमध्ये ११ डिसेंबर १९२२ साली त्यांचा जन्म झाला.त्याचं मूळ नाव युसूफ खान होतं. परंतु मुंबईत आल्यानंतर दिलीप कुमार म्हणून चित्रपटांमध्ये त्यांची ओळख झाली. त्याच्या नावाच्या बदलाची कहाणीही खूप रंजक आहे.

 

दिलीप कुमारांचे बालपण खूप त्रासात गेले. त्यांनी पुण्यात कँटिनमध्येही नोकरी केली. पुढे मुंबईत आल्यानंतर त्यांनी वडिलांना कामात मदत करण्यास सुरवात केली आणि त्यांनी उशा विकण्यासही सुरुवात केली ज्यात अयशस्वी ठरले.

 

नाव बदलण्यामागे वडिलांची भीतीही!

  • युसूफ खानना काही काम मिळावे म्हणून त्यांच्या मित्रांचे प्रयत्न सुरु होते.
  • त्यांचे मित्र युसूफ खान यांना तेव्हाचं प्रख्यात प्रोडक्शन हाऊस बॉम्बे टॉकीजच्या मालकीण देविका राणी यांना भेटण्यासाठी घेऊन गेले.
  • देविका राणी यांना युसूफ खान यांच्या देखण्या रुपात अभिनेत्याचं दर्शन घडलं.
  • त्यांनी युसूफ खान यांना चित्रपटांची ऑफर दिली.
  • मात्र, त्यांच्या वडिलांना चित्रपटांमध्ये काम करणे अजिबात आवडत नव्हते.
  • वडिलांच्या भीतीमुळे त्यांनी आपले नाव मोहम्मद यूसुफ खान वरुन दिलीप कुमार असे ठेवले.

 

वासुदेव की दिलीपकुमार?

  • युसूफ खान यांना वडिलांची भीती होतीच, पण तसेही त्यांचे युसूफ नाव आकर्षक नव्हते.
  • देविका राणी यांनी त्यांना नाव बदलण्याचा सल्ला दिला होता.
  • देविका राणी यांनी अभिनेत्याला नावांची यादी दिली.
  • त्यांना ‘वासुदेव’ आणि ‘दिलीप कुमार’ ही नावं आवडली.
  • त्यामधील दिलीप कुमार हे नाव निवडलं आणि युसूफ खानचे ते दिलीप कुमार झाले!

Tags: bombay talkiesDevika Ranidilip kumarVasudevदिलीप कुमारदेविका राणीबॉम्बे टॉकीजवासुदेवहिंदुजा रुग्णालय
Previous Post

“गणेश मूर्तींच्या उंचीची मर्यादा रद्द करा”

Next Post

“मुस्लीम समाजाच्या ५ टक्के आरक्षणाची अंमलबजावणी करा!”: नसीम खान

Next Post
naseem khan

"मुस्लीम समाजाच्या ५ टक्के आरक्षणाची अंमलबजावणी करा!": नसीम खान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!