मुक्तपीठ टीम
झुंड या चित्रपटाच्या भरघोस यशानंतर नागराज मंजुळे सध्या राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आहेत. या यशानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरील त्यांच्या महत्त्वाकांक्षी बहुभाषिक चित्रपटाच्या निर्मितीच्या स्वप्नाची आठवण करून दिली आहे. नागराज मंजुळे यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांवरील त्यांचा महत्त्वाकांक्षी बहुभाषिक त्रयी चित्रपटाचे काम कोरोना महामारीमुळे थांबले आहे. खरंतर, मंजुळे आणि अभिनेता-निर्माता रितेश देशमुख यांनी २०१९ मध्ये या चित्रपटाच्या निर्मितीची घोषणा केली होती. या चित्रपटाची निर्मिती रितेश देशमुखच्या मुंबई फिल्म कंपनी या बॅनरखाली करण्यात येणार आहे. खरंतर हा महाचित्रपट २०२१ मध्ये रिलीज होणार होता. आता कोरोना ओसरल्यानं नागराज मजुळे आपलं स्वप्न पूर्ण करू शकतील.
अभिमानाने सादर करत आहोत…
तुम्हा सर्वांचा आशिर्वाद असू द्या….
जय शिवराय !!@Nagrajmanjule @AjayAtulOnline pic.twitter.com/WIwnZHk3K0
— Riteish Deshmukh (@Riteishd) February 19, 2020
कोरोनानं रोखला मार्ग…
- ‘कोरोनामुळे आमचे वेळापत्रक विस्कळीत झाले.
- त्यामुळे आम्हाला दोन वर्षे वाया गेली.
- त्यामुळे साहजिकच आम्ही त्या चित्रपटाला शूटसाठी फ्लोअरवर नेऊ शकलो नाही.
- पण असे नाही की चित्रपट रखडला आहे.
- हा एक प्रोजेक्ट आहे ज्याबद्दल मी खूपच आतूर आहे.
- एकदा सर्वकाही सुरळीत पार पडले की मी तुम्हाला सांगेन.
आव्हानात्मक चित्रपट!
- या चित्रपटाची निर्मिती अत्यंत आव्हानात्मक असेल, असे मंजुळे यांनी सांगितले.
- हा एक ऐतिहासिक चित्रपट आहे.
- आम्ही एक असा चित्रपट बनवत आहोत, ज्यामुळे चित्रपट सृष्टीतील बरंच काही बदलेल.
- अर्थातच चित्रपटाच्या स्वरूपामुळे हे एक आव्हानात्मक काम असेल.
- मंजुळे म्हणाले, “मी जेव्हा लहान होतो तेव्हा वाटायचे की शिवाजी महाराजांवरील चित्रपट किती भारी असेल!
- मी त्या विषयावरील सिनेमे पाहिले आहेत आणि मलाही एक बनवायचा आहे.
- हा माझाही ड्रीम प्रोजेक्ट असेल.