मुक्तपीठ टीम
तरुणाई म्हटलं की वाहत्या पाण्यासारखा खळाळता उत्साह. तरुणाई म्हटलं की मोकळ्या वाऱ्यासारखी सतत सळसळ. तरुणाईला बहुधा त्यामुळेच भन्नाट आवडते ती मोकळ्या रस्त्यांवरील मनमोकळी बाइकिंग. पाच नागपूरकर तरुण बाइकर्स गुरुवारी अशाच एका बाइकिंग मोहिमेवर निघाले आहेत. ते तब्बल साडे चार हजार किलोमीटरचे अंतर कापणार आहेत. आणि तेही फक्त १४ दिवसांमध्ये.
गुरुवारी नागपुरातील झिरो माईल येथून सकाळी ११ वाजता ग्रुप कॅप्टन बसंतकुमार पांडे यांच्या हस्ते या बाइक मोहिमेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. या मोहिमेत नागपुरातील पाच तरुण बाइकर्स सहभागी आहेत. ही बाइकर्स टीम नागपूर ते नेपाळ आणि परत नागपूर हे साडेचार हजार किलोमीटरचे अंतर १४ दिवसांत कापणार आहे. ड्यूक ३९० नागपुरातील पाच तरुण बाइकर्स सहभागी आहेत. ही बाइकर्स टीम नागपूर ते नेपाळ आणि परत नागपूर हे साडेचार हजार किलोमीटरचे अंतर १४ दिवसांत कापणार आहे. वर उत्कर्ष पांडे हे या बाइकर्स मोहीम पथकाचे नेतृत्व करत आहेत. तर अभिजीत सोळंके, दर्शन सरोदे, मुकेश राणा, नील लाक्रा, श्रुतिग वानखेडे हे इतर रायडर्स आहेत.
कशी असणार आहे नागपूरकर बाइकर्सची मोहीम?
- ही मोहीम साडे चार हजार किमीची असणार आहे.
- १४ दिवसात नागपूर – नेपाळ – नागपूर असा प्रवास असेल.
- ही मोहीम मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड नेपाळमधून जाणार आहे.
- हा संघ हल्द्वानीजवळील बनबासा-भीमदत्त सीमेवरून नेपाळमध्ये प्रवेश करेल.
- नेपाळमधून नंतर काठमांडूमार्गे भारताकडे वळेल.
- पुढे ही टीम सोनौली सीमेवरून भारतात परत येईल.
- आठ डिसेंबरला बाइकर्सची ही टीम नागपुरात परत येणे अपेक्षित आहे.