मुक्तपीठ टीम
जगातील सर्वात मोठं संगीतमय कारंजं आता नागपूर शहरात उभारलं गेलंय. शहराची शान असलेल्या फुटाळा तलावाचा संगीतमय कारंजं नागपूरसाठी नवा इतिहास रचणार आहे. त्याचं कारण स्वातंत्र्यदिनी उद्घाटन होणार असलेल्या या कारंज्याच्या पाण्याच्या पडद्यावर नागपूरचा इतिहासही दिसणाराय. त्याची खास बाब म्हणजे याची हिंदीत कॉमेंट्री बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या आवाजात आणि मराठी कॉमेंट्री नाना पाटेकर यांच्या आवाजात असेल. या संगीतमय कारंजंची भव्यता इतकी असेल की,फुटाळा तलावाजवळ ४०० आसन क्षमतेची प्रेक्षक गॅलरी असेल. फुटाळ्यासमोर ११०० वाहनांसाठी पार्किंगसह १२ मजली फूड प्लाझा बांधण्यात येणार आहे. या कारंज्याची संकल्पना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आहे.
या संगीतमय कारंजंच्या उभारणीसाठी परदेशातून आर्किटेक्ट नागपुरात आले आहेत. फाऊंटनच्या हार्डवेअरची प्राथमिक चाचणी करताना गडकरींनी त्याचीही पाहणी केली. आता साऊंडसोबत पाण्याला ‘सिंक्रोनाईज ‘ करणे तसेच प्रोजेक्टरचे काम युद्धपातळीवर करण्यात येणार आहे. १५ ऑगस्टपर्यंत हे ‘ म्युझिकल फाऊंटनाचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे. हे फाऊंटन सर्वात उंच जाणारे संगीतमय कारंजं असल्याचा दावा दक्षिणेतील गायिका रेवती यांनी केला आहे .
असे असेल संगीतमय कारंजं…
- जगातील सर्वोत मोठं कारंज आपल्या महाराष्ट्रातील नागपुरात उभारलं गेलंय.
- या संगीतमय कारंजंमुळे नयनरम्य संगीतमय रंगसंगती अनुभवता येणाराय.
- हे कारंजं जगातील सर्वात मोठं संगीतमय कारंजं असेल.
- कारंजं हा १८० मीटर आहे, जो जगातील सर्वात मोठा आहे.
- जगभरातून येणाऱ्या पर्यटकांसाठी हे फाऊंटन एक ‘वास्तुशास्त्रीय चमत्कार’ असेल.
- टायगर सफारीसाठी येणाऱ्या पर्यटकांसाठीही हा संगीतमय कारंजं आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.
- यासोबतच तलावाच्या दुसऱ्या टोकाला फुलांची बाग तयार करण्यात येणार असून, त्यामध्ये जगभरातील विविध प्रजातींची फुले लावण्यात येणार आहेत.
- या संगीतमय कारंजासोबत घुमणारं संगीत ए.आर. रहमान यांचे संगीत असेल.
कारंजांच्या पाण्यावर नागपूरचा इतिहास…
- स्वातंत्र्यदिनी उद्घाटन होणार असलेल्या या कारंज्याच्या पाण्याच्या पडद्यावर नागपूरचा इतिहासही दिसणाराय.
हा शो ३५ मिनिटांचा असेल. - त्याची कॉमेंट्री अमिताभ बच्चन (इंग्रजी) , गुलजार (हिंदी) व नाना पाटेकर (मराठी) यांनी केली आहे. स्पीकरवरून येणारा आवाज आंतरराष्ट्रीय दर्जाचा असावा , यावर भर देण्यात आला आहे.
- ४ जुलैपासून दररोज रात्री प्रोग्रामिंग करण्यात येईल .
- फुटाळा तलावातील संगीत कांरजे पाहण्यासाठी ४०० आसन क्षमतेची दर्शक गॅलरी तसेच बारा मजली फूड-प्लाझा 1100 वाहनांच्या पार्किंग व्यवस्थेसह उभारण्यात येणार – केंद्रीय मंत्री नितिन गडकरी
नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारतंय विक्रमी कारंजं
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आणि नागपूरच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या फुटाळा संगीतमय कारंजं आणि लाईट-शो प्रकल्पाची उद्घाटनापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर शहरातील गणमान्य व्यक्ती व अधिकाऱ्यांसह पाहणी केली. त्यावेळी त्यांनी कारंजा प्रकल्पाविषयी महत्वाची माहिती दिली.
केंद्रीय रस्ते निधी मधून ३० कोटी रुपये पंजाबराव कृषी विद्यापीठाला देण्यात आले असून फुटाळ्याजवळील विद्यापीठ उद्यानात देश-विदेशातील पुष्पांच्या जाती आणून येथील पुष्पविविधता वाढवण्यात येणार आहे, अशी माहिती सुद्धा त्यांनी दिली. या कारंजाच्या निर्मितीसाठी विश्वस्तरावरील आर्किटेक्ट नागपूरात आले असून फाऊंटनच्या हार्डवेअरची प्राथामिक चाचणी आज गडकरी यांनी बघितली आणि पाहणी केली. या फाऊंटेनच्या निर्मितीसाठी हातभार लावणारे नागपूर सुधार प्रन्यास, महामेट्रो तसेच या प्रकल्पाचे कंत्राटदार यांचेही आभार गडकरी यांनी मानले. याप्रसंगी उपस्थित तामिळ फिल्म क्षेत्रातील गायिका रेवती यांनीसुद्धा या प्रकल्पाच्या संगीत नियोजनाविषयी माहिती दिली.