Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नाफेडने आणले भाताच्या कोंड्यापासून तयार केलेले अधिक पोषक राईस ब्रान तेल

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Nafed

मुक्तपीठ टीम

एकीकडे लोकांसाठी आरोग्यदायी जीवनशैली तर दुसरीकडे देशाचं दुसऱ्या देशांवरील तेलाच्या बाबतीतील परावलंबित्व कमी करण्याचे दुहेरी लक्ष्य साध्य करणारे पाऊल नाफेडने उचलले आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आजवर कांद्याचा विषय आला की ऐकलेले नाफेडचे नाव आता का घेत आहोत. खरंतर नाफेड कांद्यामुळे जास्त चर्चेत येत असले तरी ही संघटना अनेक पिकांबाबतीत सक्रिय असते. आता नाफेडने भाताच्या कोंड्यापासून तयार केलेले अधिक पोषक असे राईस ब्रान तेल तयार केले आहे. यामुळे वापरणाऱ्यांना आरोग्यविषयक दुष्परिणामांना तोंड द्यावे लागणार नाही. त्याबरोबरच पाम तेलाच्या आयातीवर असलेले आपले परावलंबित्वही कमी होईल.

 

कसे असणार नाफेडचे राईस ब्रान तेल?

• भाताच्या कोंड्यापासून तयार केलेल्या तेलामध्ये कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासह अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
• हे तेल आरोग्यवर्धक म्हणून कार्य करते आणि कर्करोगाचा धोका कमी करते.
• नाफेडचे भाताच्या कोंड्यापासून तयार केलेले हे तेल पोषक असणार आहे.
• या तेलात अतिरिक्त पौष्टिक तत्वे आणि जीवनसत्त्वे असतील, हे सुनिश्चित करण्यात आले आहे.
• भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार , भाताच्या कोंड्यापासून तयार केलेले शुद्ध तेल ‘अ’ आणि ‘ड’ जीवनसत्वांसाठी आवश्यक आहारातील २५-३०% तत्वांची पूर्तता करते.
• नाफेडचे भाताच्या कोंड्यापासून तयार केलेले शुद्ध तेल (फोर्टिफाइड राईस ब्रान ऑईल) सर्व नाफेड स्टोअरमध्ये आणि विविध ऑनलाइन मंचावर उपलब्ध असेल.

अलीकडेच नाफेड आणि एफसीआय म्हणजेच भारतीय खाद्य महामंडळा दरम्यान भेसळविरहित तांदुळाचे उत्पादन आणि विपणनासाठी सामंजस्य करार झाल्यासंदर्भात यावेळी भारतीय खाद्य महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण सिंघल यांनी या तेलाविषयी माहिती दिली.

 

केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव सुधांशू पांडे यांनी “नाफेड फोर्टिफाइड राइस ब्रान ऑईल” चे ई-उद्‌घाटन केले. या प्रसंगी सुधांशू पांडे म्हणाले की, नाफेडच्या पुढाकाराने भविष्यात आयात खाद्यतेलाच्या वापरावरील देशाचे अवलंबित्व लक्षणीय प्रमाणात कमी होईल.यामुळे भारतीय खाद्यतेल उत्पादकांना यापुढे संधी उपलब्ध होतील आणि पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारत उपक्रमालाही गती मिळेल, असेही ते म्हणाले. या भाताच्या कोंड्यापासून बनवलेल्या अधिक जीवनसत्व युक्त तेलाचे विपणन नाफेडच्या (भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महामंडळ मर्यादित) माध्यमातून होणार आहे.

 

भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (एफएसएसएएआय) चे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण सिंघल, नाफेड चे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार चड्ढा आणि भारतीय खाद्य महामंडळ (एफसीआय) चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आतिश चंद्र या ई-उद्‌घाटन कार्यक्रमाला उपस्थित होते.


Tags: prime minister narendra modiएफएसएसएएआयनाफेडसचिव सुधांशू पांडे
Previous Post

समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी टप्प्यातील कामास गती मिळणार

Next Post

भारतीय सैन्यात एनसीसी स्पेशल एंट्री स्कीममधून ५५ जागांसाठी संधी

Next Post
Indian army

भारतीय सैन्यात एनसीसी स्पेशल एंट्री स्कीममधून ५५ जागांसाठी संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!