Saturday, May 31, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अंमली पदार्थ चाचण्यांसाठी नाडा इंडियाची रजिस्टर्ड टेस्टिंग पूल यादी जाहीर

December 22, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
NADA

मुक्तपीठ टीम

  • नाडा इंडियाच्या आरटीपी २०२३ यादीत २४ क्रीडाप्रकारांमधील एकूण १४९ खेळाडूंचा समावेश
  • या यादीत ७ दिव्यांग खेळाडूंचा देखील समावेश,१ जानेवारी २०२३ पासून ही यादी नाडा इंडियाच्या वेबसाईटवर उपलब्ध होईल.

२०२३ या वर्षासाठी नाडा इंडियाची( राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक संस्था) आरटीपी यादी नाडा इंडियाच्या वेबसाईटवर १ जानेवारी २०२३ पासून उपलब्ध होणार आहे. नाडा इंडियाच्या आरटीपी २०२३ यादीमध्ये एकूण १४९ खेळाडू असून त्यात ६० महिला आणि ८९ पुरुष खेळाडूंचा समावेश आहे. ही यादी सर्वोच्च प्राधान्यक्रमाच्या क्रीडाप्रकारांमधील जोखमींच्या सर्वसमावेशक मूल्यांकनावर आधारित आहे. यामध्ये ७ दिव्यांग क्रीडापटूंचा देखील समावेश आहे.

सर्व संबंधिंत खेळाडूंना आरटीपी यादीत समावेश केल्याची नोटिस पाठवण्यात आली असून तिची प्रत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा महासंघाना देण्यात आली आहे.

या यादीत असलेल्या सर्व खेळाडूंनी रात्रीच्या मुक्कामासाठी त्यांच्या पत्त्यासह त्यांच्या दिनक्रमाचे वेळापत्रक, स्पर्धांचे वेळापत्रक आणि ठिकाण यांसह त्यांच्या वास्तव्याची माहिती दर तीन महिन्यांनी आणि चाचणीसाठी उपलब्ध असतील आणि संपर्कप्राप्त असू शकतील आणि देऊ न शकलेली चाचणी पुन्हा करण्यासाठी असा दररोज ६० मिनिटांचा कालावधी कळवणे गरजेचे आहे.योग्य प्रकारचे नियोजन करण्यासाठी खेळाडूंनी प्रत्येक तिमाहीचा प्रारंभ होण्यापूर्वी १५ दिवस आधी प्रत्येक तिमाहीचा तपशीलवार कार्यक्रम देणे गरजेचे आहे.

खेळाडूला आपल्या ठिकाणाची माहिती वेळोवेळी कळवणे गरजेचे आहे, असे न झाल्यास आपल्या ठिकाणाची माहिती कळवण्यात अपयश आल्याची नोटिस या खेळाडूला पाठवण्यात येईल. आरटीपीमधील खेळाडूला १२ महिन्यांच्या कालावधीत आपल्या ठिकाणाची माहिती कळवण्यात तीन वेळा अपयश आल्यास( ज्यामध्ये माहिती देण्यात आलेले अपयश आणि/ किंवा चुकवलेली चाचणी यांचे एकत्रीकरण असेल.) ही कृती उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक नियमांचा भंग मानली जाईल.अशा खेळाडूवर १२ ते २४ महिन्यांच्या अपात्रतेची(पहिला गुन्हा) किंवा अशाच प्रकारे पुन्हा गुन्हा घडल्यास अधिक कालावधीच्या अपात्रतेची कारवाई केली जाईल.

नाडा इंडिया खेळाडूंना त्यांच्या वास्तव्याची माहिती वाडा( जागतिक उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक संस्था) एडीएएमएस मंचावर किंवा खेळाडूच्या केंद्रीय अर्जात भरण्याच्या प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी देखील प्रयत्न करत आहे.


Tags: NADANADA IndiaRegistered Testing Pool Listनाडानाडा इंडियारजिस्टर्ड टेस्टिंग पूल यादी
Previous Post

कोरोनाच्या नविन व्हेरिएंटला घाबरण्याचे कारण नाही – आरोग्यमंत्री सावंत

Next Post

लोकसभा आणि राज्यसभेतील रंगात फरक का? जाणून घ्या संसद भवनाशी संबंधित माहिती

Next Post
Lok Sabha, Rajya Sabha

लोकसभा आणि राज्यसभेतील रंगात फरक का? जाणून घ्या संसद भवनाशी संबंधित माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!