Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोनाच्या नविन व्हेरिएंटला घाबरण्याचे कारण नाही – आरोग्यमंत्री सावंत

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
tanaji sawant

मुक्तपीठ टीम

कोरोनाच्या नविन व्हेरिएंटचा राज्यात अद्यापही एकही रूग्ण सापडलेला नसून प्रतिबंधात्‍मक उपाययोजना म्हणून विमानतळावर तपासणी आणि तपासणीत काही आढळून आल्यास तात्काळ विलगीकरण करण्याच्या सुचना दिल्या असल्याचे आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

चीन सह इतर काही देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा मोठ्याप्रमाणात वाढला असून प्रतिबंधात्‍मक उपाययोजनांबाबत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आपल्या राज्यात कोरोना चाचणी,उपचार, लसीकरण तसेच कोरोना रूग्णांचा तपास हे पुन्हा एकदा सुरू करण्याच्या सुचना आरोग्य विभागास दिल्या असल्याचे मंत्री सावंत यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगून राज्यात BF.7 ह्या नविन व्हेरिएंटचा अद्यापही एकही रूग्ण आढळून आला नाही मात्र शेजारील राज्यात चार सापडले आहेत, त्यामुळेच प्रतिबंधात्‍मक उपाय म्हणून विमानतळ, राज्याच्या सीमारेषा, या भागातून येणारया व्यक्तींची थर्मल टेस्टींग तसेच इतर अत्यावश्यक चाचणी करून घेण्यात येणार आहेत, याबरोबरच त्या चाचणीत काही आढळून आले तर लगेचच विलगीकरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी या प्रसंगी सांगितले.

कोरोनाचे निर्बंध अद्याप कोठेही लावण्यात येणार नसून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील आवश्यक ते निर्णय घेण्यात येणार असल्याचे सावंत यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले. त्याचबरोबर आज राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा संपूर्ण आढावा घेतला असून यंत्रणेस अलर्ट मोडवर राहाण्याच्या सुचना दिल्या असल्याचे या प्रसंगी त्यांनी सांगितले. राज्यात मोठ्याप्रमाणावर लसीकरण झाले असून नविन व्हेरिएंट हा तेवढा घातक नाही असे सांगितले.

पत्रकार परिषदेच्या आधी आरोग्य मंत्री सावंत, प्रधान सचिव संजय खंदारे, सचिव नविन सोना, संचालक डॉ नितीन अंबाडेकर, डाॅ.साधना तायडे यांच्यासह राज्यातील सर्व आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य आधिकारी, यांच्याशी दूरदृश्‍य प्रणाली द्वारे त्यांनी संवाद साधला आणी सतर्क राहाण्याच्या सुचना दिल्या.


Tags: coronaHealth Minister Tanaji SawantMaharashtraNew Varientआरोग्यमंत्री तानाजी सावंतकोरोनामहाराष्ट्र
Previous Post

जुनी पेन्शन योजना लागू करता येणार नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

अंमली पदार्थ चाचण्यांसाठी नाडा इंडियाची रजिस्टर्ड टेस्टिंग पूल यादी जाहीर

Next Post
NADA

अंमली पदार्थ चाचण्यांसाठी नाडा इंडियाची रजिस्टर्ड टेस्टिंग पूल यादी जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!