Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

चिपळूणकरांच्या मदतीला नाम फाउंडेशन; वाशिष्टी आणि शिव नद्या होणार ‘गाळमुक्त’

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
NAAMFOUNDATION

मुक्तपीठ टीम

चिपळून मधील वाशिष्टी आणि शिव नद्यांना गाळमुक्त करण्यासाठी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांची नाम फाउंडेशन ही संस्था पुढे सरसावली आहे. स्वतः नाना पाटेकर यांनी ४ जानेवारीला चिपळुणात येऊन गाळ उपसाचा शुभारंभ केला. यावेळी नाना पाटेकर यांनी चिपळूणकरांना आव्हान केलं आहे की, आपणही पुढे या आपण दोघे मिळून गाळ काढुया. आणि चिपळूणला पुरमुक्त करुया. या संस्थेच्या वतीनं नद्यांचा गाळ दिवसरात्र काढला जात आहे.

 

गाळामुळे पूरग्रस्त चिपळणूकरांच्या मदतीला नाम फाऊंडेशन!

  • चिपळूणसाठी पूर ही तशी आता नेहमीचीच आपत्ती झाली आहे.
  • गेल्या वर्षी तर मोठा फटका बसला.
  • सततच्या त्रासानं कंटाळलेल्या शहरानं समस्येचं मूळ शोधलं तर पुढे आलं ते कारण आहे, शहरातून वाहणाऱ्या नद्यांमध्ये साचलेल्या गाळाचं!
  • यासाठी चिपळूणकर एकटवले आणि नद्यांचा गाळ काढून टाकावा या मागणीसाठी उपोषण,आंदोलनेही करू लागले. जवळपास महिनाभर या मागणीसाठी चिपळूणकर त्यानंतर सरकारला जाग आली आणि सरकारनं गाळ काढण्यासाठी मदत जाहीर केली. मात्र, सरकारनं सांगितलं म्हणजे झालं असं नाही. इथंही तसंच झालं. जसं आवश्यक तसं झालं नाही. अखेर चिपळूणकरांच्या मदतीला आली ती दुष्काळग्रस्तांच्या, पाणीटंचाईग्रस्तांच्या मदतीसाठी ओळखली जाणारी नाम फाउंडेशन. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांची संस्था.

 

नाना पाटेकरांचं चिपळूणकरांना आवाहन

  • चिपळूणच्या बचावसमितीचे उपोषण सुरु असताना अभिनेते नाना पाटेकर यांच्या नाम फाऊंडेशन या संस्थेनं दखल घेऊन या दोन्ही नद्यांचा गाळ उपसण्यासाठी पुढाकार घेतला आणि स्वतः नाना पाटेकर यांनी ४ जानेवारीला चिपळुणात येऊन गाळ उपसाचा शुभारंभ केला.
  • चिपळूणमध्ये शिव नदीचा गाळ काढण्याचं काम दिवस रात्र सुरु आहे.
  • अजूनही या कामासाठी लागणाऱ्या यंत्रसामुग्री वाढवण्यात येणार आहेत.
  • तीन आठवड्यात शिवनदीचा ७० टक्के गाळ उपसा करुन झाला आहे.
  • अनेक वर्ष नद्यांमध्ये साचलेला गाळ काढला जात आहे.
  • त्यामुळे नद्या मुक्तपणे वाहू लागल्या आहेत.
  • चिपळूणात आलेल्या नाना पाटेकर यांनी चिपळूणकरांना आवाहन केलं आहे की, आपणही पुढे या आपण दोघे मिळून गाळ काढुया.
  • आणि चिपळूणला पुरमुक्त करुया.

 

चिपळूणच्या नद्या विनाअडथळा वाहणार आणि पावसाळ्यात चिपळूणकर शांत झोपणार!

  • नाम संथेची चार यंत्रं सध्या गाळ काढण्यासाठी कार्यरत आहेत.
  • नद्यांचा गाळ काढल्यानं नदीकाठच्या रहिवाशांनी मोकळा श्वास घेतला आहे.
  • आमच्या घराशेजारी वाहणारी नदी पुर्णपणे गाळानं भरली होती.
  • त्यामुळे पुराचे पाणी नदीपात्राबाहेर येऊन आमच्या घरात पाणी शिरत असे.
  • पण आता नाम फाउंडेशननं गाळ काढल्यानं पाणी नदीपात्राबाहेर येण्याचं प्रमाण नक्कीच कमी होईल.
  • पावसाळ्यात आम्हीही आता शांतपणे झोपू…पाऊसही एन्जॉय करू!

Tags: chiplunmakrand anaspureNaam Foundationnana patekarVashishti riverचिपळूननाम फाउंडेशनवाशिष्टीशिव नदी
Previous Post

मुंबई मनपाचा अर्थसंकल्प: सर्वांना पाणी! २०० नवी आरोग्य केंद्रं! अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना अद्दल!!

Next Post

कोरोना चाचणीसाठी तरुणीच्या गुप्तांगातून स्वॅब! विकृताला शिक्षा!! पण हा तर अलर्ट कॉल…साऱ्याजणींसाठी सजग राहण्याचा!

Next Post
Amaravati Apeksha Article

कोरोना चाचणीसाठी तरुणीच्या गुप्तांगातून स्वॅब! विकृताला शिक्षा!! पण हा तर अलर्ट कॉल...साऱ्याजणींसाठी सजग राहण्याचा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!