मुक्तपीठ टीम
चिपळून मधील वाशिष्टी आणि शिव नद्यांना गाळमुक्त करण्यासाठी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांची नाम फाउंडेशन ही संस्था पुढे सरसावली आहे. स्वतः नाना पाटेकर यांनी ४ जानेवारीला चिपळुणात येऊन गाळ उपसाचा शुभारंभ केला. यावेळी नाना पाटेकर यांनी चिपळूणकरांना आव्हान केलं आहे की, आपणही पुढे या आपण दोघे मिळून गाळ काढुया. आणि चिपळूणला पुरमुक्त करुया. या संस्थेच्या वतीनं नद्यांचा गाळ दिवसरात्र काढला जात आहे.
गाळामुळे पूरग्रस्त चिपळणूकरांच्या मदतीला नाम फाऊंडेशन!
- चिपळूणसाठी पूर ही तशी आता नेहमीचीच आपत्ती झाली आहे.
- गेल्या वर्षी तर मोठा फटका बसला.
- सततच्या त्रासानं कंटाळलेल्या शहरानं समस्येचं मूळ शोधलं तर पुढे आलं ते कारण आहे, शहरातून वाहणाऱ्या नद्यांमध्ये साचलेल्या गाळाचं!
- यासाठी चिपळूणकर एकटवले आणि नद्यांचा गाळ काढून टाकावा या मागणीसाठी उपोषण,आंदोलनेही करू लागले. जवळपास महिनाभर या मागणीसाठी चिपळूणकर त्यानंतर सरकारला जाग आली आणि सरकारनं गाळ काढण्यासाठी मदत जाहीर केली. मात्र, सरकारनं सांगितलं म्हणजे झालं असं नाही. इथंही तसंच झालं. जसं आवश्यक तसं झालं नाही. अखेर चिपळूणकरांच्या मदतीला आली ती दुष्काळग्रस्तांच्या, पाणीटंचाईग्रस्तांच्या मदतीसाठी ओळखली जाणारी नाम फाउंडेशन. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांची संस्था.
नाना पाटेकरांचं चिपळूणकरांना आवाहन
- चिपळूणच्या बचावसमितीचे उपोषण सुरु असताना अभिनेते नाना पाटेकर यांच्या नाम फाऊंडेशन या संस्थेनं दखल घेऊन या दोन्ही नद्यांचा गाळ उपसण्यासाठी पुढाकार घेतला आणि स्वतः नाना पाटेकर यांनी ४ जानेवारीला चिपळुणात येऊन गाळ उपसाचा शुभारंभ केला.
- चिपळूणमध्ये शिव नदीचा गाळ काढण्याचं काम दिवस रात्र सुरु आहे.
- अजूनही या कामासाठी लागणाऱ्या यंत्रसामुग्री वाढवण्यात येणार आहेत.
- तीन आठवड्यात शिवनदीचा ७० टक्के गाळ उपसा करुन झाला आहे.
- अनेक वर्ष नद्यांमध्ये साचलेला गाळ काढला जात आहे.
- त्यामुळे नद्या मुक्तपणे वाहू लागल्या आहेत.
- चिपळूणात आलेल्या नाना पाटेकर यांनी चिपळूणकरांना आवाहन केलं आहे की, आपणही पुढे या आपण दोघे मिळून गाळ काढुया.
- आणि चिपळूणला पुरमुक्त करुया.
चिपळूणच्या नद्या विनाअडथळा वाहणार आणि पावसाळ्यात चिपळूणकर शांत झोपणार!
- नाम संथेची चार यंत्रं सध्या गाळ काढण्यासाठी कार्यरत आहेत.
- नद्यांचा गाळ काढल्यानं नदीकाठच्या रहिवाशांनी मोकळा श्वास घेतला आहे.
- आमच्या घराशेजारी वाहणारी नदी पुर्णपणे गाळानं भरली होती.
- त्यामुळे पुराचे पाणी नदीपात्राबाहेर येऊन आमच्या घरात पाणी शिरत असे.
- पण आता नाम फाउंडेशननं गाळ काढल्यानं पाणी नदीपात्राबाहेर येण्याचं प्रमाण नक्कीच कमी होईल.
- पावसाळ्यात आम्हीही आता शांतपणे झोपू…पाऊसही एन्जॉय करू!