मुक्तपीठ टीम
टाटा समूहाचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन यांनी स्वच्छ आणि हरित ऊर्जेचे संक्रमण होणारच आहे आणि भारत त्याचे नेतृत्व करण्यासाठी सक्षम असल्याचे सांगतिले. ते पुढे म्हणाले की तांत्रिक प्रगती आधीच झाली आहे आणि स्वच्छ ऊर्जा संक्रमण अधिक परवडणारे बनवण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवले पाहिजेत.
काय म्हणाले एन चंद्रशेखरन ?
- अहमदाबादमधील पंडित दीनदयाळ ऊर्जा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांना संबोधित करताना चंद्रशेखरन म्हणाले की, हरित उर्जेकडे वळण्याचा दबाव आगामी काळात वाढेल आणि स्वच्छ ऊर्जेकडे वळणे निश्चितच आहे. परंतु आपल्याला अधिकाधिक नवीन आणि स्वच्छ ऊर्जा हवी आहे जेणेकरून ती अधिक परवडणारी असेल.
- आपल्याला हायड्रोजन-आधारित ऊर्जा, इलेक्ट्रिक बॅटरी, स्टोरेज सिस्टम, औद्योगिक कचरा पुनर्वापर तंत्रज्ञान इ. आवश्यकता आहे.
हे सर्व आपल्या आयुष्यात घडेल परंतु हे उपाय अधिक किफायतशीर आहेत याची खात्री करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जी प्रगती होत आहे ती अद्भुत असून आगामी काळात ती अधिक वेगवान होईल. नवीकरणीय ऊर्जा आघाडीवर देशाच्या प्रगतीचे कौतुक करताना ते म्हणाले की, आपण एका नवीन परिवर्तनाच्या उंबरठ्यावर आहोत आणि भारत केवळ आर्थिकच नव्हे तर इतर अनेक क्षेत्रांत नेत्रदीपक विकासाकडे वाटचाल करत आहे.