Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“माझे रेशन, माझा अधिकार” अभियानासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत

June 5, 2021
in सरकारी बातम्या
0
ration

मुक्तपीठ टीम

कोरोनाच्या कठीण कालावधीत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे अन्नधान्य उपलब्ध व्हावे यासाठी “माझे रेशन, माझा अधिकार” या अभियानांतर्गत माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी TISS संस्थेची मदत घेण्यात येत असून त्यांच्यासह इतर स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती कैलास पगारे, (भा.प्र.से.) नियंत्रक शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई यांनी दिली आहे.

 

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील प्रत्येक लाभार्थ्यांना त्याचे हक्काचे देय असलेल्या अन्नधान्याचा तपशील शासनाच्या mahaepos.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ही माहिती लाभार्थ्यांना मिळणेसाठी संस्थांनी मदत करावी, “एक देश, एक रेशन कार्ड” या योजनेअंतर्गत परप्रांतीय, स्थलांतरीत पात्र लाभार्थ्यांना राज्यांअतंर्गत तसेच जिल्ह्यांतर्गत पोर्टेबिलिटी सुविधेचा वापर करुन राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना त्यांच्या नजीकच्या अधिकृत शिधावाटप दुकानातून अन्नधान्याचा लाभ घेता येतो याची माहिती जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत पोहचवावी यासाठी प्रयत्न करावे. NER मध्ये वर्ग करण्यात आलेल्या शिधापत्रिकाधारकांची शासनाने या कोरोनाच्या कठीण काळाची दखल घेऊन अन्नधान्य वितरण सुरु केले आहे. ही माहिती लाभार्थ्यांना देण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

 

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील पात्र लाभार्थ्याना अन्नधान्य वितरणासंबधी तक्रार असल्यास हेल्पलाईन क्रमांक 022-22851428 तसेच ई-मेल आयडी dycor.ho-mum@gov.in यावर तक्रार नोंदविता येत असल्याची माहिती लाभार्थ्यांना देण्यात यावी. या कामी मुंबई- ठाणे शिधावाटप क्षेत्रात संबंधीत शिधावाटप अधिकारी यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे.

 

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील पात्र लाभार्थ्याना जास्तीत जास्त लाभ व्हावा, यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन कैलास पगारे, (भा.प्र.से.) नियंत्रक शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई यांनी केले आहे.

 


Tags: mumbaimy ration my rights campaignration cardमाझे रेशन माझा अधिकार
Previous Post

#मुक्तपीठ शनिवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र

Next Post

घोडबंदर मार्गावरील वरसावे नाका ते काजूपाडापर्यंतचा भाग यंदाही पाण्याखाली जाण्याची भीती

Next Post
mira bhayandar

घोडबंदर मार्गावरील वरसावे नाका ते काजूपाडापर्यंतचा भाग यंदाही पाण्याखाली जाण्याची भीती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!