Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भाजपानं उट्टं काढलं? महाराष्ट्रात भाजपाचे १२ आमदार निलंबित झाले होते, आता राज्यसभेत अनिल देसाई, प्रियंका चतुर्वेंदीसह १२ भाजपाविरोधी खासदार निलंबित!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
mva suspends 12 bjp mlas, bjp suspends 12 anti bjp mps

मुक्तपीठ टीम

संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपाने विरोधकांना धक्का दिला आहे. राज्यसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी १२ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये शिवसेनेच्या अनिल देसाई आणि प्रियंका चतुर्वेंदी या महाराष्ट्रातील खासदारांचा समावेश आहे. निलंबित खासदारांना अधिवेशनात सभागृहाच्या कामकाजात सहभागी होता येणार नाही. योगायोग असा की, पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्राच्या विधानसभेतून भाजपाच्या १२ आमदारांनाच निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे एकप्रकारे भाजपाने तशाच आरोपाखाली विरोधातील शिवसेनेच्या दोन, काँग्रेसच्या सहा आणि इतर चार अशा बारा खासदारांना निलंबित करून एक प्रकारं उट्टं काढल्याची चर्चा आहे.

 

काय घडलं राज्यसभेत?

११ ऑगस्ट रोजी पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी खासदारांनी त्यांच्या हिंसक वर्तनाने आणि सुरक्षा कर्मचार्‍यांवर जाणूनबुजून हल्ले करून सभागृहाच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचवली आहे, असे निलंबनाच्या नोटिसीत नमूद करण्यात आले आहे. या शिवसेनेच्या २ खासदारांना निलंबित करण्यात आली आहे. ही कारवाई हिवाळी अधिवेशनासाठी करण्यात आली आहे. त्यामुळे १२ खासदारांना सोमवारपासून सुरु झालेल्या अधिवेशनात सहभागी होता येणार नाही.

राज्यसभेतून १२ खासदार निलंबित

१२ राज्यसभा खासदारांना सभागृहात शिस्तभंग केल्याबद्दल निलंबित करण्यात आले आहे.

  • शिवसेना-अनिल देसाई
  • शिवसेना- प्रियंका चतुर्वेदी
  • सीपीएम- इलामाराम करीम
  • काँग्रेस- फुलो देवी नेताम
  • काँग्रेस- छाया वर्मा
  • काँग्रेस- रिपुन बोरा
  • काँग्रेस- राजमणी पटेल
  • काँग्रेस- सय्यद नासिर हुसेन
  • काँग्रेस- अखिलेश प्रसाद सिंग
  • सीपीआयचे बिनय विश्वम
  • तृणमूल काँग्रेस- डोला सेन
  • काँग्रेस- शांता छेत्री

 

जुलैमध्ये झाले होते १२ भाजपा आमदार निलंबित

  • विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात आघाडी आणि भाजपा आमदारांमध्ये खडाजंगी झाली होती.
  • ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी भाजपच्या बारा आमदारांना निलंबित करण्यात आलं होतं. त्यांचे निलंबन एक वर्षासाठी होते.

 

भाजपाच्या निलंबित आमदारांची नावे

  • संजय कुटे
  • आशिष शेलार
  • जयकुमार रावल
  • गिरीश महाजन
  • अभिमन्यू पवार
  • हरिश पिंपळे
  • राम सातपुते
  • जयकुमार रावल
  • पराग अळवणी
  • नारायणे कुचे
  • बंटी बागडिया
  • योगेश सागर

 

भाजपाच्या या बारा आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. एका वर्षासाठी हे निलंबन असेल.


Tags: Anil DesaiBJPCongressShivsenaWinter Sessionअनिल देसाईकाँग्रेसभाजपाशिवसेनासंसदेचे हिवाळी अधिवेशन
Previous Post

शिवसेनेच्या अनिल देसाई, प्रियंका चतुर्वेंदींसह १२ खासदार राज्यसभेतून निलंबित!

Next Post

राज्यात ५३६ नवे रुग्ण, ८५३ रुग्ण बरे होऊन घरी!

Next Post
corona

राज्यात ५३६ नवे रुग्ण, ८५३ रुग्ण बरे होऊन घरी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!