मुक्तपीठ टीम
संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपाने विरोधकांना धक्का दिला आहे. राज्यसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी १२ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये शिवसेनेच्या अनिल देसाई आणि प्रियंका चतुर्वेंदी या महाराष्ट्रातील खासदारांचा समावेश आहे. निलंबित खासदारांना अधिवेशनात सभागृहाच्या कामकाजात सहभागी होता येणार नाही. योगायोग असा की, पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्राच्या विधानसभेतून भाजपाच्या १२ आमदारांनाच निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे एकप्रकारे भाजपाने तशाच आरोपाखाली विरोधातील शिवसेनेच्या दोन, काँग्रेसच्या सहा आणि इतर चार अशा बारा खासदारांना निलंबित करून एक प्रकारं उट्टं काढल्याची चर्चा आहे.
काय घडलं राज्यसभेत?
११ ऑगस्ट रोजी पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी खासदारांनी त्यांच्या हिंसक वर्तनाने आणि सुरक्षा कर्मचार्यांवर जाणूनबुजून हल्ले करून सभागृहाच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचवली आहे, असे निलंबनाच्या नोटिसीत नमूद करण्यात आले आहे. या शिवसेनेच्या २ खासदारांना निलंबित करण्यात आली आहे. ही कारवाई हिवाळी अधिवेशनासाठी करण्यात आली आहे. त्यामुळे १२ खासदारांना सोमवारपासून सुरु झालेल्या अधिवेशनात सहभागी होता येणार नाही.
राज्यसभेतून १२ खासदार निलंबित
१२ राज्यसभा खासदारांना सभागृहात शिस्तभंग केल्याबद्दल निलंबित करण्यात आले आहे.
- शिवसेना-अनिल देसाई
- शिवसेना- प्रियंका चतुर्वेदी
- सीपीएम- इलामाराम करीम
- काँग्रेस- फुलो देवी नेताम
- काँग्रेस- छाया वर्मा
- काँग्रेस- रिपुन बोरा
- काँग्रेस- राजमणी पटेल
- काँग्रेस- सय्यद नासिर हुसेन
- काँग्रेस- अखिलेश प्रसाद सिंग
- सीपीआयचे बिनय विश्वम
- तृणमूल काँग्रेस- डोला सेन
- काँग्रेस- शांता छेत्री
जुलैमध्ये झाले होते १२ भाजपा आमदार निलंबित
- विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात आघाडी आणि भाजपा आमदारांमध्ये खडाजंगी झाली होती.
- ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी भाजपच्या बारा आमदारांना निलंबित करण्यात आलं होतं. त्यांचे निलंबन एक वर्षासाठी होते.
भाजपाच्या निलंबित आमदारांची नावे
- संजय कुटे
- आशिष शेलार
- जयकुमार रावल
- गिरीश महाजन
- अभिमन्यू पवार
- हरिश पिंपळे
- राम सातपुते
- जयकुमार रावल
- पराग अळवणी
- नारायणे कुचे
- बंटी बागडिया
- योगेश सागर
भाजपाच्या या बारा आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. एका वर्षासाठी हे निलंबन असेल.