मुक्तपीठ टीम
नांदेडमधील देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची मतमोजणी होत आहे. आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीतर्फे लढलेले काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांनी १ लाख ७ हजार ४० मते मिळवत ४१ हजार ९३३ मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपाचे उमेदवार माजी आमदार सुभाष साबणे यांचा पराभव केला आहे. अंतापूरकरांना हजार मते मिळाली आहते. तर भाजपाच्या साबणेंना मते मिळाली आहेत. राज्याच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांचा गदारोळ माजला आहे. ईडी, सीबीआय, आयटी यांच्या कारवाईंचं चक्र सुरु आहे. नांदेडमधील प्रभावशाली नेते अशोक चव्हाण यांच्याविरोधातही चौकशी होत असल्याच्या निवडणूक काळातच बातम्या आल्या. पण तरीही नांदेडमध्ये आघाडीनं भाजपाला हरवलं!
देगलूर बिलोली निकाल
- काँग्रेस जितेश अंतापूरकर विजयी – १,०८८४०
- भाजपा – सुभाष साबणे – ६६,९०७
- वंचित बहुजन आघाडी डॉ. उत्तम इंगोले
देगलूर बिलोली मतदार संघ हा नांदेड जिल्ह्यात आहे. काँग्रेसचे नेते, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रभावक्षेत्रातील या मतदारसंघात २०१९मध्ये काँग्रेसचे अंतापूरकर विजयी झाले होते. मात्र, त्यांचे निधन झाले. त्यामुळे तेथे पोटनिवडणूक जाहीर झाली. पंढरपूर पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीची जागा हिरावून घेतल्यामुळे उत्साहात असलेल्या भाजपाने देगलूर बिलोलीत विजय मिळवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले. मात्र, इथं पंढरपूरसारखा विजय मिळवणे शक्य झाले नाही.
काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर होत असलेल्या या पोटनिवडणुकीत १२ उमेदवार रिंगणात होते. प्रमुख लढत ही तीन उमेदवारांमध्ये झाली. संपूर्ण महिनाभर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण देगलूर बिलोलीमध्ये होते. भाजपानेही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. भाजपचे अनेक मोठे नेते आमदार पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण देगलूरमध्ये जोर लावला होता.
अनुसुचित जातीसाठी आरक्षित असणाऱ्या या मतदारसंघात काँग्रेसकडून जितेश अंतापूरकर, भाजपाचे उमेदवार सुभाष साबणे यांच्यातील लढतीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. उत्तम रामराव इंगोले हेही मैदानात असल्याने रंगत वाढली होती.