मुक्तपीठ टीम
मुस्लिम बुद्धिमंतांच्या एका गटाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांची भेट घेतली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तात्पुरत्या कार्यालयात ही बैठक झाली. समाजात जातीय सलोखा वाढवण्यासाठी त्यांच्यात चर्चा झाली. माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस वाय कुरेशी आणि दिल्लीचे माजी उपराज्यपाल नजीब जंग हे देखील यावेळी उपस्थित होते.
दोन तास चाललेल्या या बैठकीत दोन्ही समाजातील बंधुभाव वाढावा यासाठी त्यांच्यात चर्चा झाली. या बैठकीत जातीय सलोख्याशिवाय देशाचा विकास होऊ शकत नाही यावर चर्चा झाली. यावेळी लेफ्टनंट जनरल (निवृत्त) जमीरुद्दीन शाह, अलीगड मुस्लिम विद्यापीठाचे माजी कुलगुरू, शाहिद सिद्दीकी आणि माजी खासदार सईद शेरवानी हे देखिल बैठकीला उपस्थित होते.
देशात एकोपा वाढवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे दोन्ही बाजूंनी मान्य करण्यात आले. कुठे काही मतभेद किंवा गैरसमज असतील तर तेही सोडवायला हवेत. गांधींच्या विचारसरणीतून देशात एकोपा प्रस्थापित करण्यासाठी चर्चा झाली.